पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे परिस्थितीची आणि काळाची गरज आहे. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर मो नं ९८९००१३५२० २० वर्षात मेहनत करून कमवलेलं १ वर्षात ९०% पेक्षा जास्त गमवावे लागले. आणि शिवाय स्वतःच आणि स्वतःच्या कुटुंबाच आयुष्य पणाला लावून कॉम्पीटिटरच्या समोर जाऊन उभ रहावं लागलं.  कॉम्पीटिटर स्वतःला हजारो किलोमीटर स्वतःच्या मूळ लोकेशन पासुन दुर ठेवून त्या तरुणाला संपवण्याचा प्लॅन करतो. केवढा धक्का..केवढा फ्रस्ट्रेशन केवढा सेटबॅक !! आणि विशेष म्हणजे तो 36 वर्षाचा तरुण आत्महत्या करत नाही. त्याही परिस्थितीमध्ये मनोधैर्य  न खचता स्वतःची टीम तयार करतो. आणि पेशन्स ठेवत कॉम्पिटिटरला मात देवुन तीस वर्षाच्या मेहनतीने कमावलेलं जे गमावलं होतं ते पुढील १ वर्षात पुन्हा कमवतो. आणि एवढंच नाही तर समोरील असलेल्या कॉम्पिटिटरला ही जबरदस्त तडाखे देतो. सगळ्या गोष्टींवर उपाय शोधणारा तो ३६ वर्षांचा तरुण... "छत्रपती शिवाजी महाराज" महाराजांच्या आयुष्यातील सेटबॅक म्हणजे पुरंदर चा तह होय. ज्यात महाराजांनी ९०% हुन अधिक किल्ले औरंगजेबाला दिले. चार पाच पावले मागे आले नव्हे तर तब्बल २० वर्ष मागे आले. परंतु या ही पेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे महाराजांनी पुढील ८