*👏🏻देवाकडे काय मागावं👏🏻* तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते... ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असंत... आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या... पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत... अशी अकरा वर्षे गेली. बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना. ती आपल्या पतीला म्हणाली की... "जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच." बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!! ते म्हणाले... " मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही" कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले.. तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!! यात्रतेतली बांगड्याची, खेळण्य...
तलवार : (तरवार). एक प्राचीन व परंपरागत शस्त्र. धनुर्वेदातील वर्गीकरणानुसार तलवार हे अमुक्त म्हणजे हातात धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. तलवारीने शत्रूला भोसकून, फटकारून आणि घाव घालून घायाळ करता येते. पूर्वीच्या काळी पदाती सैनिक व घोडेस्वार द्वंद्वयुद्धासाठी तलवार वापरीत. तलवारीच्या मारामुळे होणाऱ्या दुखापती कमी करण्यासाठी ढाल व चिलखत यांचा उपयोग होत असे. शत्रूच्या तलवारीचे वार स्वतःच्या तलवारीवर झेलून किंवा चुकवून आत्मरक्षण करण्याची प्रथा आहे. पाते व मूठ हे तलवारीचे दोन मुख्य भाग होत. प्रारंभ काळात तलवारीच्या पात्याचा आकार कण्हेरीच्या पानासारखा असल्यामुळे पात्यास पान असेही म्हटले जाते. सामान्यपणे पात्यावरूनच तलवारींचे वर्गीकरण केले जाते. हे पाते मुठीमध्ये बसवून तलवार हाताच्या पंज्यात पकडता येते आणि मुठीमुळे पंज्याचे व बोटांचे रक्षणही होते. मुठीचेही विविध प्रकार आढळतात. पात्याच्या आकार, प्रकारातील विविधतेवरून ती वापरणाऱ्याची मनोभूमिका कळून येते त्याचप्रमाणे लढाईत तलवार कशा रीतीने हाताळली जात असावी, हे समजते. अश्मयुगातील दगडी धारदार आयुधापासून तलवार उत्क्रांत झाली असावी...
मृत्यू का येतो ,, ? जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे. _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या, होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे. _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही. सद्गुरुंच्या क...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा