पोस्ट्स

संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आळंदी देवाची लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
गायत्री  मंत्र  सर्वाक्षर  महिमा *''ॐ''*   या  अक्षराचा  उच्चार  केला  असता  मस्तकातील  भाग  प्रभावित  होतो.   *''भू:''*   या  अक्षराच्या  उच्चाराने  उजव्या  डोळयावरील  चार बोटांचा  कपाळाचा  भाग  जागृत   होतो. *''भूव:''*  च्या  उच्चारणाने  मानवाच्या  भृकुटीच्या  वरील  तीन  अंगुलीचा  भाग  प्रभावित  होतो. *''स्व:''*   या  अक्षराच्या  उच्चाराने  डाव्या  डोळयावरील  कपाळाचा  चार  अंगुली  इतका  भाग  जागृत   होतो. *''तत्''*  च्या  उच्चाराने  आज्ञा  चक्रामध्ये  असलेली  'तापिनी'  ग्रंथीतील  सूप्त  असलेली  'साफल्य'  शक्ति   जागृत   होते. *''स''*  च्या  उच्चाराने  डाव्या  डोळयातील  सफलता  नांवाच्या  ग्रंथीमध्ये  सुप्त  र...

बाबासाहेबांचे वारकरी संप्रदायातील संतावरील प्रेम. By- Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
स्वत: आंबेडकरांना भारतीय उपखंडांतील चालिरीती, धर्म संकल्पना, संस्कृती या बद्दल संपूर्ण आणि सम्यक भान होते. त्यांनी पहिले वृत्तपत्र पाक्षिक ‘मुकनायक’ 31 जानेवारी 1920 ला सुरू केले. या पाक्षिकाच्या पहिल्याच अंकात बोधवाक्य म्हणून तुकाराम महाराजांचा अभंग वापरला आहे. काय करू आता धरूनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजविले ॥ नव्हे जगी कोणी मुकीयांचा जाण ।  सार्थक  लाजून नव्हे हीत ॥ तुकाराम महाराजांचा अभंग वापरायचे कारण त्यांना वारकरी संप्रदाय आणि त्याचा प्रभाव याची पूर्ण जाणीव होती. जनसामान्यांच्या प्रबोधनाचे काम करावयाचे तर त्यासाठी त्यांना समजेल अशीच भाषा वापरली पाहिजे. त्या काळात आणि खरं तर आजही तळागाळात वारकरी संप्रदायाने एक अध्यात्मिक सामाजिक परिभाषा रूजवली. आपल्या मुक राहिलेल्या सामाजाच्या दु:खाला वाचा फोडण्यासाठी आपण नायक बनलोच पाहिजे इतकेच नाही तर प्रत्येक सामान्य मुक जन हा ‘मुकनायक’ बनला पाहिजे हे त्यांना अभिप्रेत होते. आणि त्यासाठी त्यांनी तुकाराम महाराजांचा अभंग वापरला. अभंगाच्या पुढच्या ओळी ज्या त्यांनी प्रत्यक्ष वापरल्या नाहीत पण त्यातूनही बाबासाहेबांचा दृष्टीकोन क...

नऊ संख्या आणि नवरात्र By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व. 🌺 नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी. 🔶 दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री. 🔶 दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका. 🌺 महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई),  श्री एकवीरादेवी (कार्ला). 🌺 नवरात्रींचे ‘नऊ’ रंग लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा. 🌺 नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश. 🌺 नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी. 🌺 ‘नऊ’ प्रकारची दानं अन्नदान, धनदान, भूदान,...

अध्यात्म म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
कवित्व आणि तत्व वाचे बरवे कवित्व | कवित्वी बरवे रसिकत्व | रसिकत्वीही परतत्व | स्पर्श जैसा || ३४५|८|ज्ञा. भाषेमध्ये कविता, कवितेच्या जोडीला रसिकता, आणि रसिकतेला स्पर्श असावा, तत्वज्ञानाचा अशी ही चढती कमान आहे. तत्वज्ञान किंवा अध्यात्म ह्या गोष्टी आपल्या डोक्यावरून जातात, त्या विषयांमध्ये आम्हाला रस नाही असे म्हणणारे लोक एका अर्थाने अनाहूतपणे आपली स्वतःची फसवणूक करत असतात कारण कधीना कधी कामाच्या धबडग्यातून डोके बाहेर पडते तेव्हा मी कोण आहे? मी कोठून आलो? आणि माझे पुढे काय होणार आहे ? असले तीन विचार प्रत्येकाच्या मनामध्ये डोकावतातच. दुःखाच्या प्रसंगात माझ्याच बाबतीत असे का घडले किंवा अनपेक्षितपणे आयुष्याला कलाटणी मिळाल्यावर हे कसे काय घडले बुवा? असे प्रश्नही माणूस काही काळ तरी चघळत राहतो. शहरातला माणूस निसर्गाच्या सान्निध्यात प्रवासाच्या निमित्ताने गेला आणि त्याचे मन सजग असेल तर निसर्गातल्या वैविध्यपूर्ण सौंदर्याने आणि रचनेने तो प्रभावित होतोच परंतु निसर्गातल्या पशुपक्षी आणि वनस्पतींच्या लाजवाब घडणीने अवाकही होतो. हे कसे झाले, कोणी केले की आपोआप घडत गेले? अरण्यातले मानवरहित जी...

ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज एकत्र येणे ही काळाची गरज. By- Nilesh Konde-Deshmukh

इमेज
नाब्रह्म क्षत्रमृध्नोति ना क्षत्रं ब्रह्म वर्धते । ब्रह्म क्षत्रं च सम्पृक्तम् इह चामुत्र वर्धते ॥ – मनुस्मृति, अध्याय ९, श्‍लोक ३२२ अर्थ : ब्राह्मतेजाविना क्षात्रतेज वाढू शकत नाही आणि क्षात्रतेजाविना ब्राह्मतेज वाढू शकत नाही. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आले, तर त्यांचा या लोकी, तसेच परलोकीही उत्कर्ष होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय जर एकत्र आले, तर ते दोघे मिळून वनेच्या वने जाळणार्‍या अग्नीप्रमाणे शत्रूंना जाळून टाकतील. महाभारतात असे सांगितलेे आहे की, ब्रह्म क्षत्रेण संसृष्टं क्षत्रं च ब्रह्मणा सह । उदीर्णौ दहतः शत्रून् वनानीवाग्निमारुतौ ॥ – महाभारत, पर्व ३, अध्याय २७, श्‍लोक १० अर्थ : वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील. खरंतर आज चाललेल्या निती अनितीच्या लढाईत, अधर्म च्या या लढाईत ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज एकत्र नाही आले तर अधर्मी लोक आपल्या कृत्यांद्वारे जाती पतीचे राजकारण करतील आणि जर असं झालं तर राष्ट्र, धर्म आणि पर्यायाने सुसंस्कृत वारसेच पतन अटळ आहे म्हणू...

तलवारीचा इतिहास. By Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
तलवार : (तरवार). एक प्राचीन व परंपरागत शस्त्र. धनुर्वेदातील वर्गीकरणानुसार तलवार हे अमुक्त म्हणजे हातात धरून लढण्यासाठी असलेले एक शस्त्र आहे. तलवारीने शत्रूला भोसकून, फटकारून आणि घाव घालून घायाळ करता येते. पूर्वीच्या काळी पदाती सैनिक व घोडेस्वार द्वंद्वयुद्धासाठी तलवार वापरीत. तलवारीच्या मारामुळे होणाऱ्या दुखापती कमी करण्यासाठी ढाल व चिलखत यांचा उपयोग होत असे. शत्रूच्या तलवारीचे वार स्वतःच्या तलवारीवर झेलून किंवा चुकवून आत्मरक्षण करण्याची प्रथा आहे. पाते व मूठ हे तलवारीचे दोन मुख्य भाग होत. प्रारंभ काळात तलवारीच्या पात्याचा आकार कण्हेरीच्या पानासारखा असल्यामुळे पात्यास पान असेही म्हटले जाते. सामान्यपणे पात्यावरूनच तलवारींचे वर्गीकरण केले जाते. हे पाते मुठीमध्ये बसवून तलवार हाताच्या पंज्यात पकडता येते आणि मुठीमुळे पंज्याचे व बोटांचे रक्षणही होते. मुठीचेही विविध प्रकार आढळतात. पात्याच्या आकार, प्रकारातील विविधतेवरून ती वापरणाऱ्याची मनोभूमिका कळून येते त्याचप्रमाणे लढाईत तलवार कशा रीतीने हाताळली जात असावी, हे समजते. अश्मयुगातील दगडी धारदार आयुधापासून तलवार उत्क्रांत झाली असावी...