पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मागणीचे डिपॉजीट

*👏🏻देवाकडे काय मागावं👏🏻* तुकारामांचे वडील बोल्होबा हे पांडुरंगाचे निस्सिम भक्त होते... ते दरवर्षी न चुकता पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असंत... आणि दरवर्षी त्यांची पत्नी कणकाई माऊली त्यांच्या मागे लागत असे की मलाही पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला न्या... पण बोल्होबा काही तिचे ऐकत नसंत... अशी अकरा वर्षे गेली. बाराव्या वर्षी जेव्हा ते पंढरपूरला जाण्यास निघाले तेव्हा कणकाई माऊली काही ऐकेचना. ती आपल्या पतीला म्हणाली की... "जरी यावेळी तुम्ही मला पांडुरंगाच्या दर्शनाला नेले नाहीत तरी मी तुमच्या मागून येणारच." बोल्होबांचा नाईलाज झाला कारण स्रीहट्ट व बालहट्ट टाळता येत नाही ना..!! ते म्हणाले... " मी तुला माझ्या बरोबर नेईन पण एक अट तुला पाळावी लागेल ती म्हणजे मंदीरात गेल्यानंतर पांडुरंगाकडे काही म्हणजे काही मागायचे नाही" कणकाई माऊली आनंदली तिने पतीला सांगीतले की मी काही मागणार नाही. पती पत्नी पंढरपुरास निघाले..  तिथे पोहोचल्यानंतर कणकाई माऊली मनाशी विचार करीत चालली होती की आज आलोच आहोत तर पांडुरंगाचे दर्शन घेऊ आणि पंढरपूरही पाहू..!! यात्रतेतली बांगड्याची, खेळण्य

आपल्यांची वेळीच टकटक ऐकायला शिका. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
{ लहानपनी   अर्धि   राहिलेली गोष्ट }👌👌 चिमणीचे सगळे काम आटोपले ती जरा निवांत झाली आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं की,  अरेच्च्या! आपण अजून कावळ्यासाठी दारच उघडलेलं नाही.  तिला विलक्षण अपराधी वाटलं.  तिनं बंद दारामागचा कानोसा घेतला. दाराबाहेर शांतता होती.  ती शांतता चिमणीला असह्य झाली. तिनं तत्परतेनं दार उघडलं. दाराबाहेर कावळा नव्हता. तिने आजू बाजूला फिरून पाहिलं, कावळा कुठेही नव्हता. 'गेला असेल कुठेतरी... येईल परत'  …. तिने स्वत:च्या मनाची समजूत काढली.  मात्र, रात्र मावळली... दिवस उगवला, संध्याकाळ झाली आणि परत रात्र आली तरी कावळ्याचा काही पत्ताच नव्हता.  चिमणीचं मन आज कशातच रमेना … बाळाला न्हाऊ घालण्यातही नाही आणि बाळाला गंध-पावडर करण्यातही नाही …  कारण एव्हाना तिला सवय झाली होती …. कावळ्याने बंद दारावर केलेल्या टकटकीची ……  तो आवाज असा काही कानात साठला होता की दिवसातून अनेक वेळा तिने दारावर टकटक झालीय असं समजून दार उघडलं होतं आणि बाहेर कोणी नाही हे पाहून निराशेने बंद केलं होतं...  अनेक दिवस उलटले ... चिमणीच्या मनातून काही कावळा जाईना.  मग तिने कावळ्याचा शोध घ्यायचाच

उपजे ते नाशे

मृत्यू का येतो ,, ?                             जे उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपि दिसे.                        _*संत ज्ञानेश्वर*_ या विश्वाचे काही नियम आहेत, जे सर्व विश्वाला पाळावे लागतात. अशा  नियमां मधील हा एक नियम आहे. या विश्वात ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या,  होत आहेत व होतील त्या नाश पावल्या, नाश पावत आहेत व नाश पावतील. मानवी देह  निर्माण होतो म्हणून त्याला शेवटही आहे. ज्याला आरंभ आहे त्याला शेवट आहे.                    _*मृत्यू कधी येतो ?*_ मृत्यू कधीही लवकर येत नाही किंवा उशिराही येत नाही. मृत्यू नेहमीच, ज्यावेळी यायला पाहिजे त्यावेळीच येतो. या जन्मीचे प्रारब्ध संपले की मृत्यू येतो. जे कर्म पक्व होऊन फळ देण्यास  सिद्ध झालेले असते, त्याला 'प्रारब्ध' असे म्हणतात. 'प्रारब्ध' या शब्दाला  एक नकारार्थी किंवा असहायतेची छटा आहे. पण तसे असण्याची काही गरज नाही.  सद्गुरुंच्या कृपेचा आधार घेत विवेकाचा वापर करून, श्रेयस निवड करत आपले  प्रारब्ध आपल्याला बदलता येते. हीच तर मानवी जन्माची सर्वात मोठी उपलब्धी  आहे. मानवा व्यतिरिक्त इतर जीवांना मात्र ही उपलब्धी मिळालेली नाही. हिं

विश्वास

*Belief (विश्वास) आणि Trust (विश्वास)* दोन्ही शब्दांचा अर्थ "विश्वासच" आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे. एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर  जात होता. त्याच्या  खांद्यावर  त्याचा लहान मुलगा होता. दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.  हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून  त्याने ते अंतर पूर्ण केलं. जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या. तोंड फाडून कौतुक केले. तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो. सेल्फी  काढू लागले. त्याचं अभिनंदन  करू लागले.  तो डोंबारी सगळ्यांना  उद्देशुन म्हणाला  "मला हे पून्हा एकदा करावसं वाटतं. तूम्हाला विश्वास वाटतो का मी हे पून्हा करू शकेन?" सगळी माणसं एक आवाजात म्हणाली "हो, तू हे परत एकदा नक्कीच  करू शकतोस." डोंबारी म्हणाला "तूम्हाला विश्वास आहे मी हे करू शकेन?" पुन्हा सगळे ओरडले &quo