अंघोळ केंव्हा करु नये. By- Nilesh Konde-Deshmukh
|| अंघोळ केंव्हा करू नये. अंघोळीचे वेळापत्रक || स्ना न म्हणजे शरिराची शुद्धि करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये जितके महत्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्व हे स्नानाला आहे. अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे. 🚿 ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे 4 ते 6. मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8. राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10. प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12. त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड. ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ. ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते. मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो. नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते. 6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते. ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्या सारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो. सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उ...