अंघोळ केंव्हा करु नये. By- Nilesh Konde-Deshmukh

|| अंघोळ केंव्हा करू नये. अंघोळीचे वेळापत्रक ||

स्नान म्हणजे शरिराची शुद्धि करणे. सकाळी उठून अंघोळ केल्याशिवाय मनुष्याने काहीही खाऊ पिऊ नये जितके महत्व शास्त्रात मंत्र नामस्मरणाला आहे, तितके महत्व हे स्नानाला आहे. अंघोळ ही शास्त्रानुसार झाली पाहिजे म्हणजे तुम्ही कितीही उशिरा झोपला तरीही अंघोळ ही त्या त्या वेळेला झाली पाहिजे.

🚿 ब्रम्हमुहूर्ताची अंघोळ म्हणजे 4 ते 6.

मनुष्याची अंघोळ म्हणजे 6 ते 8.

राक्षसांची अंघोळ म्हणजे 8 ते 10.

प्रेत भूतांची अंघोळ म्हणजे 10 ते 12.

त्यानंतरची अंघोळ म्हणजे शरीराला किड.

ब्रह्म मुहूर्ताचे स्नान म्हणजे देवांची अंघोळ.

ह्या वेळेत अंघोळ केल्याने मनुष्याचे शरीर निरोगी राहते. शरीर जसे शुद्ध होते तसेच मन देखील शुद्ध होते.
मनात नकारात्मक विचार येत नाही. आळशीपणा न येता सर्व कामे वेळच्या वेळी होतात आणि मनुष्याला एक उत्साह येतो.

नामस्मरण पूजा झाल्यामुळे मनुष्याची दैविक शक्ति वाढते.

6 ते 8 ही मनुष्याची अंघोळ असते.

ह्या वेळेस अंघोळ केली की पापी मनुष्यही, परोपकारी मनुष्या सारखा वागतो. म्हणजे राग द्वेष कमी होतो.
सकाळी स्नान झाल्यामुळे कामासाठी उत्साह येतो. पण ब्रह्ममहुर्ताच्या अंघोळी इतका उत्साह मिळत नाही.
फक्त मनुष्य सर्व बाबतीत समप्रमाणात असतो. सकाळी स्त्रोत्र वाचन झाल्यामुळे अर्धेपट त्याला दैवी शक्ति मिळते.

राक्षसांची अंघोळ 8 ते10 ह्या वेळेत जो मनुष्य अंघोळ करतो त्याच्या मनात क्रोध अहंकार जास्त निर्माण होतो.

मत्सर लोभ जास्त मनुष्यात येतो. दैविक शक्ति फार कमी मिळते.
शरीराचा कोठा साफ न झाल्यामुळे अनेक आजार मनुष्याला जड़तात.

अशक्तपणा BP मधुमेह हे आजार ह्या वेळेस स्नान केलेल्या व्यक्तीला जास्त असतो.

कामात उत्साह नसतो. आळशीपणा काम करतांना सतत येतो त्यामुळे मनुष्य सारखा चिड़चिड़ा होतो.

प्रेतभूतांची अंघोळ 10 ते 12 ह्या वेळेस अंघोळ करणारी व्यक्ति ही खुप आळशी होते.

काम करायचा कंटाळा येणे, सतत झोपुन राहणे, खुप खाणे. त्यामुळे असिडिटी कोठा साफ न होणे तसेच केस गळणे लवकर सुरकुत्या येणे चरबी वाढणे असे आजार होतात. मनुष्य आळशी झाल्यामुळे त्याला कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नाही. तो मनुष्य इतका रागिट होतो की राग आला की त्याचा स्वतावर ताबा राहत नाही.

☆तुम्ही कितीही झोपा काम करा पण सकाळची पूजा ही सकाळीच झाली पाहिजे. तरच त्याची शक्ति मिळेल. म्हणून मनुष्याने कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान देवपूजा केल्यावर थोड्यावेळ झोपले तर काही हरकत नाही पण स्नान देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे. तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाहीतर मग आजारांना आमंत्रण. कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते. म्हणून स्नान देवपूजा ह्या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे.

ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.
९८९००१३५२०.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संजीवन समाधी म्हणजे नेमके काय. By-Nilesh Konde-Deshmukh

श्री दिलीप तांबोळकर काका साधकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.By-Nilesh Konde-Deshmukh.

उपजे ते नाशे