श्री दिलीप तांबोळकर काका साधकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.By-Nilesh Konde-Deshmukh.
वारकरी मंच चे जेष्ठ सदस्य, मार्गदर्शक चिंचवड पुणे येथील श्रीविष्णूसहस्रनाम साधक श्री. दिलीप तांबोळकर काका हे उत्तम शंखवादक आहेत. चिंचवड च्या प्रत्येक सामूहिक उपासनेला ते अगत्याने उपस्थित असतात. त्यांनी केलेल्या मंगल व पवित्र शंखवादनानेच प्रत्येक उपासनेचा आरंभ होत असतो.
सर्व साधकांना एकत्र बांधून ठेवण्यात शंखनादाचा महत्त्वाचा वाटा असतो आणि हे काम उत्तमरित्या दिलीपकाका पार पाडतात.
आज तांबोळकर काकांच्या पत्नीची तिथ ! आपल्या पत्नीची आठवण येणार आणि त्या आठवणी साठवणीत राहुन दुःख होऊन मन दुर्बल होणारच परंतु कधीकधी या आठवणी नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देऊन जातात याचा प्रत्यय आज काकांच्या कृतीतून आला. एवढ्या निराशाजनक परिस्थिती असताना आपण सकारात्मक राहणे व त्यातही वैयक्तिक दुःखाने खचून न जाता मनाची उभारी धरुन जमेल तसं सामाजिक कार्यात काका नेहमीच हातभार लावत असतात. त्यांच्या सौभाग्यवती पण नेहमी राम मंदिरात श्रीविष्णूसहस्रनाम उपासनेला आवर्जून येत असत. आपल्या प्रिय व्यक्तीला जे प्रिय होते तेच जर आपण अंशतः करु शकलो तर आपल्या मनाला अधिक समाधान लाभते. कारण आपली प्रिय व्यक्ती जी आपल्या मनात असते ती हे सगळं पाहात असते अशी आपली मनाची धारणा असते.
काकांनी आजच्या दिवसाला उदास न राहता आठवणींना कृष्णार्पण करायचे असे ठरवले. आज संपूर्ण दिवस अत्यंत प्रसन्न व ध्येयनिष्ठ मनाने त्यांनी श्रीविष्णूसहस्रनामची एकूण ५२ आवर्तने केली. अत्यंत चिकाटीचे हे व्रत आहे.
आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार तर असतोच पण मनाचेही शिल्पकार असतो. मनाची स्थिती आणि विचार मंगल आणि पवित्र करण्याचा दिवा आपल्याच कडे असतो. तो विधायक व सकारात्मक विचारांनी घासून पुसून चकचकीत करायाचा असतो. आणि मग त्यात प्रेरणेची ज्योत तेवती ठेवायची आहे. या ज्योतीला नामस्मरणाचे तेल घालून ज्योतीच्या शांत प्रकाशाचा अनुभव आपला आपणच घ्यायचा आहे. हो पण या प्रकाशात फक्त आपणच नाही तर असंख्य जण उजळण्याची ताकद असते.
काकांच्या या कृतीमुळे खचलेल्या प्रत्येकाला मिळावी यासाठीच हा लिखाणाचा खटाटोप.
काकुंच्या विनम्र अभिवादन आणि काकांच्या हातुन या पुढे ही आम्हा साधकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळावे या कार्यासाठी काकांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही भगवंत पांडुरंग चरणी प्रार्थना.
ॐ नमो भगवते वासुदेवाय
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी आणि साधक वर्ग.
संकलन : ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर
मो नं ९८९००१३५२०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा