पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पर्यावरण रक्षक अशोकराव बिचकुले. By-Nilesh Konde-Deshmukh.

इमेज
वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत विचारावर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या जिवाच रान करणारे पर्यावरण रक्षक श्री अशोकराव बिचकुले मामा. आज मामांच्या लग्नाचा वाढदिवस या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त मामांनी आपला वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा केला. तसं पाहायला गेलं तर वृक्षारोपण हे मामांसाठी काही नवीन नाही. आज आपण जर भोसरी ते नाशिक फाटा या मार्गावर गेलो तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला सुंदर असे हिरवेगार वृक्ष डौलाने मिरवताना दिसतात. हे वृक्ष मामांनी अथक प्रयत्नातून लावलेले आहे. श्री अशोकराव बिचकुले उर्फ मामा या पर्यावरण प्रेमी माणसानं नुसतं वृक्ष लावलेच नाही तर त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वतः घेतली उन्हाळ्यामध्ये त्या वृक्षांना पाणी घालणे असो किंवा पावसाळ्यामध्ये त्याच्या बाजूस गवत काढणे असते हे मामा स्वतः आपल्या हाताने करताना दिसतात. साधी राहणी उच्च विचारसरणी प्रमाणे संत विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मामा पर्यावरण जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आणि विशेष करून आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याकारणाने त्