पर्यावरण रक्षक अशोकराव बिचकुले. By-Nilesh Konde-Deshmukh.

वृक्षवल्ली आम्हा सोयरे या संत विचारावर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्या जिवाच रान करणारे पर्यावरण रक्षक श्री अशोकराव बिचकुले मामा.
आज मामांच्या लग्नाचा वाढदिवस या लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त मामांनी आपला वाढदिवस हा वृक्षारोपण करून साजरा केला.
तसं पाहायला गेलं तर वृक्षारोपण हे मामांसाठी काही नवीन नाही. आज आपण जर भोसरी ते नाशिक फाटा या मार्गावर गेलो तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला सुंदर असे हिरवेगार वृक्ष डौलाने मिरवताना दिसतात. हे वृक्ष मामांनी अथक प्रयत्नातून लावलेले आहे. श्री अशोकराव बिचकुले उर्फ मामा या पर्यावरण प्रेमी माणसानं नुसतं वृक्ष लावलेच नाही तर त्या वृक्षाच्या संगोपनाची जबाबदारी स्वतः घेतली उन्हाळ्यामध्ये त्या वृक्षांना पाणी घालणे असो किंवा पावसाळ्यामध्ये त्याच्या बाजूस गवत काढणे असते हे मामा स्वतः आपल्या हाताने करताना दिसतात.
साधी राहणी उच्च विचारसरणी प्रमाणे संत विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मामा पर्यावरण जपण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करताना दिसतात आणि त्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन आणि विशेष करून आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असल्याकारणाने त्यांच्या कार्याचा लिखान रुपी केलेला छोटासा प्रयत्न.

पुन्हा एकदा श्री अशोकराव बिचकुले मामा यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा आपल्या हातून अशीच पर्यावरणाच्या रक्षणाची काम होत राहावी आणि या कार्यासाठी आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही भगवंत पांडुरंगा चरणी प्रार्थना.

ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर
मो नं ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh