धन्यवाद साप्ताहिक शिव पर्व.
SPप्रतिनीधी:१२ मार्च: वारकरी मंच महाराष्ट्र राज्य चालवत असलेल्या व्यसन मुक्ती अभियानाचा जनजागृती हा पहिला टप्पा गावपातळीवर राबवण्यात येणार असुन मार्च अखेरपर्यंत गावोगावी जाऊन व्यसनाचे शारीरिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक दुष्परिणाम या बाबतीत मी स्वता प्रबोधन करणार आहे अशी माहिती ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख यांनी साप्ताहिक शिव पर्व च्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख पुढे म्हणाले की तरूणाईला व्यसनांच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात गावपातळीवर हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे या अभियानात तरूण तरूणी ही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहे. पुढे ते म्हणाले की व्यसन ही समाजाला लागलेली किड आहे. जो पर्यंत एखादे गाव व्यसन मुक्त होणार नाही तो पर्यंत त्या गावाची प्रगती व परिणामी राष्ट्राची ही प्रगती होणार नाही. व्यसन हे कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त करणार तर आहेच परंतु कुटुंबासोबत राष्ट्र हितासाठी देखील मारक आहे. या साठीच व्यसन मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय वारकरी मंचाने घेतलेला आहे.
त्याचबरोबर त्यांनी शिव पर्व शी बोलताना या अभियानात मोठ्या प्रमाणात तरूणाईने सहभागी व्हावे असे आवाहन ही केलेले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा