पारंपरिक होळी सोबतच व्यसनांची होळी साजरी करावी तरूणाईला वारकरी मंच कडुन आवाहन.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.
पारंपरिक होळी सोबतच व्यसनांची होळी साजरी करावी असे तरुणाईला आवाहन.- ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.
व्यसनांमुळे शारीरिक, मानसिक, आर्थिक व सामाजिक हानी होत असते. यामुळे अनेक कुटूंबेही उध्वस्त झाली आहेत. यामुळे गुन्हे, घात-अपघांतामध्येही वाढ झालेली असतानाही नागरीक त्यात गुरफटत असल्याने त्यापासून नागरिकांची सुटका व्हावी म्हणून वारकरी मंचाच्या वतीने व्यसनांची होळी करण्यात यावी असे आवाहन तरूणाईला करण्यात आले आहे.
या उपक्रमात सहभागी झालेल्यांनी त्यांना जडलेले व्यसन एका कोऱ्या कागदावर लिहून त्याचे होळीत दहन केले पाहिजे, जे निर्व्यसनी आहेत त्यांनी होळीमध्ये कोरे कागद टाकून व्यसनांपासून दूर असल्याचे सांगुन होळीच्या अग्निला साक्षी ठेवून मी आजच्या दिवसापासून कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही, अशी शपथ घेतली पाहिजे.
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य राबवत असलेल्या व्यसन मुक्ती अभियानाचा पहिला टप्पा जनजागृती या विषयावर बोलताना ही भावना अभियान प्रमुख ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा