व्यसनाची संगत संपवी आयुष्याची रंगत. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

व्यसनांबाबत कितीही प्रबोधन झाले तरीही याला तरुणाईची मस्ती दाद देत नाही, असेच म्हणावे लागेल. मात्र एखादा विषय जोपर्यंत डोक्यात शिरत नाही तोपर्यंत तो सातत्याने डोळ्यासमोर लादला गेला पाहिजे. म्हणुन प्रबोधन होणे गरजेचे आहे. सरकार एकीकडे व्यसनमुक्तीचा प्रचार करत आहे तर दुसरीकडे मात्र दारू सिगरेट तंबाखू यांचे कारखाने उभारण्यासाठी परवानगी देत आहे. सरकारच्या या दुप्पटी धोरणामुळे दिवसा गणित व्यसनाधीन तरुण-तरुणींची संख्या वाढत चाललेले आपल्याला दिसत आहे.

आता मंग व्यसनाधीनतेचा हा वेगानं होणारा प्रादुर्भाव रोखायचा कसा? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे एकच प्रबोधन. प्रबोधनाच्या माध्यमातून आपण जे तरुण-तरुणी व्यसनांमध्ये पडणार आहे यांना नशेपासून रोखू शकतो आणि हे नव्याने व्यसन करायला लागलेले आहे त्यांना आपण समुपदेशनाने व्यसनांच्या विळख्यातून बाहेर काढू शकतो. जवळपास 80 टक्के आपण प्रबोधनाच्या माध्यमातून आणि 20 टक्के उपचाराच्या माध्यमातून आपण व्यसनमुक्ती करू शकतो.

व्यसनमुक्ती काळाची गरज आहे. आजच्या तरुण पिढीला व्यसनांच्या आहारी जाण्यापासून रोखणे गरजेचे आहे. तरच समाजाची व देशाची प्रगती होईल असे मला वाटते.



सहभागी व्हावे.

वारकरी मंच आयोजित व्यसन मुक्ती अभियान,
अभियान प्रमुख.
ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.
९८९००१३५२०.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh