छत्रपतींची ललकारी. By-Nilesh Konde-Deshmukh

छत्रपतींची ललकारी.

महाराज दरबारात प्रवेशताना जी ललकारी दिली जायची तीला मराठीत गारद म्हणतात
ऊर्दूमध्ये ह्या ललकारीला अल्काब तर संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली म्हणले जाते
छत्रपती शिवरायांची अल्काब व तिचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात

#दुर्गपती - गडकोटांचे अधिपती, ज्यांचे गडकोटांवर आधिपत्य (राज्य) आहे असे

#गज_अश्वपती - असे महाराज ज्यांच्याकडे त्यांच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे
त्यावेळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं
तर हा शब्द आपण वैभवसंपन्न असही म्हणू शकतो

#भूपती_प्रजापती - वास्तविक राजाभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमिशी झालेला विवाह आहे म्हणजेच त्या शासनकर्त्याने त्या भुमिचे व प्रजेचे वर हे पद स्विकारले आहे व तो यांचे सर्वथा रक्षण करणार
हे त्यांचे प्रथम कर्तव्य आहे

#सुवर्णरत्नश्रीपती - नानाविध हिरे माणिक मोती व सुवर्ण ( सोने ) ह्याच्यावर ज्याचे आधिपत्य ( मालकी ) आहे शिवरायांच्या बाबती ३२ मणी सिंहासनाचे १ क्रोड होनांचे अधिपती

#अष्टावधानजागृत - आठ प्रहर आठ दिशांवर जागृत लक्ष असणारे भूपाल ( राजा )

#अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांचा पदरी प्रत्येक शास्त्रात निपूण असलेले आठ प्रधान आहेत
आणि राज्यकारभारात त्यांचा सल्लाही घेणारे राजे

#न्यायालंकारमंडीत - कर्तव्यकठोर, न्यायकठोर सत्याच्या व न्यायाच्या बाजूने निकाल देणारे महाराज

#शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत - प्रत्येक शस्त्रविद्येत व शास्त्रात पारंगत (निपूण) असलेले राजे

#राजनितीधुरंधर - राजकारणात ( राजनितीमध्ये ) तरबेज असलेले राजे

#प्रौढप्रतापपुरंधर - पराक्रम करून ज्यांनी आपला ठसा उमटवला असे परमप्रतापी राजे

#क्षत्रियकुलावतंस - क्षत्रिय कुलात जन्म घेतलेले व त्यात सर्वात ऊंच प्रतीचा ( अवतंस ) पराक्रम गाजवलेले राजे

#सिंहासनाधिश्वर - जसा देव्हार्यात देव शोभून दिसतो तसेच सिंहासनावर शोभून दिसणारे सिंहासनाचे अधिपती

#महाराजाधिराज - सर्व भूपालांमध्ये उठून दिसतो व सार्या राजांनी ज्यांचे मांडलिकत्व स्विकारावं असे राजा

#राजाशिवछत्रपती - ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत अथवा ज्यांच्यावर प्रजेने छत्र धरून आपला अधिपती स्विकारले आहे किंवा ज्यांच्या नभाने छत्र धरले आहे असे शिवराय

#मुजरा.......#राजं..........#मुजरा...... 

राजश्रिया विराजित सकळगुणमंडळीत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस सिँहासनाधीश्वर हिंदवी स्वराज्य संस्थापक भोसलेकुलदीपक, मुघलदल संहारक, कीर्तिवंत, बुद्धिवंत , राजाधिराज योगीराज, दुर्गपती,गज-अश्वपती,भूपती प्रजापती,राजनितीधुरंधर ,
शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत ,अष्टावधानजागृत,न्यायालंकारमंडीत,सुवर्णरत्नश्रीपती श्रीमंत
#श्री_श्री_श्री_छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh