कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.
अभिष्टचिंतन.
24 एप्रिल हा कामगार नेते श्री संतोष (अण्णा) बेंद्रे साहेब यांचा जन्मदिवस.
खरं तर कामगार क्षेत्राला आत्तापर्यंत अनेक विचारवंतांचे आणि निडरपणे काम करणाऱ्या कामगार नेत्यांचे नेतृत्व लाभलेले आहे. परंतु जेवढे कामगार नेते होऊन गेले या कामगार नेत्यांनी आपली दुसरी फळी म्हणजे आपल्या नंतर हा वारसा दुसऱ्या पिढीकडे नेतृत्वाचा जाऊन दिला नसल्यामुळे आणि राजकीय हव्यासापोटी कामगार क्षेत्राचा बाजार मांडला गेल्यामुळे अल्पावधी काळामध्ये कामगार क्षेत्र हे लयास मिळायला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कामगार नेत्यांनी आज पर्यंत फक्त कार्यकर्ते घडवले परंतु कामगार क्षेत्रामधून एखादा कामगार नेता घडत आलेला नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही.
एका ठिकाणी काही वयस्कर लोक शेतामध्ये धान्य पेरत होती त्यावेळी बाल वयात असलेल्या भगतसिंग ने ही पेरणी चालू असताना एका वयस्कर माणसाला विचारलं की तुम्ही काय करत आहात. त्यावर तो वयस्कर माणूस म्हणाला आम्ही धान्य पेरत आहे. हे धान्य जमिनीमध्ये पेरल्यानंतर माझ्याकडं असे भरपूर धान्य तयार होईल आणि मी उपाशी लोकांची भूक भागू शकेल हे वाक्य कानी पडल्यावर भगतसिंग पळत पळत घरामध्ये गेले घरामध्ये एक दोन बंदुका पडलेल्या होत्या भगत ने त्या बंदुका उचलून आणल्या आणि पेरणी चालू असलेल्या शेतांमध्ये गाडायला सुरुवात केली त्या वेळेस त्या वयस्कर माणसाने विचारलं अरे भगत क्या कर रहा है भगतसिंग म्हणाले मी देखील बंदुकांची पेरणी करत आहे या बंदुका पेरल्यानंतर अशा असंख्य बंदुका माझ्याकडे तयार होतील आणि जास्त बंदुका माझ्याकडे आल्यानंतर मी भारत देशाला स्वतंत्र मिळवून देईल आणि मित्रांनो त्या वेळेस त्या वयस्कर माणसांनी भगतसिंग त्याला सांगितलं भगत अगर बोना है तो अपने विचार बोअ. यही विचार आनेवाली तरुण पिढी के खुन मे बारूद बनके दौडेंगा भगत तुला जर पेरायचेच आहे तर तुझे विचार पेर. हेच विचार येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतील. त्यानंतर देशाला स्वतंत्र मिळाल्याशिवाय राहणार नाही.
मित्रांनो ही घटना सांगण्या मागचं कारण एकच की कामगार क्षेत्र लयाला चालले असताना, कामगार क्षेत्राची वाताहत होत असताना कामगारांना अंधाराकडून उजेडाकडे नेण्यासाठी, कामगारांमध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, कामगारांना प्रेरणा देण्यासाठी, कामगारांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्यासाठी, अनेक संकटासोबत दोन हात करून जर कोणी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील तर ते एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे श्री संतोष (अण्णा) बेंद्रे साहेब होय.
कामगारांमध्ये जाऊन कामगार क्षेत्राला चांगले दिवस आणण्यासाठी कामगारांमध्ये सकारात्मक विचारांची पेरणी करणारा हा कामगार नेता खरं तर आपल्या सर्वांना नेतृत्व म्हणून लाभला हे आपलं सर्वांचं भाग्य समजावं लागेल.
परंतु मित्रांनो नारायण सुर्वेंनी एका कविते मध्ये सांगितल्या प्रमाणे
रोजी रोटीचा व्यवहार रोजचाच आहे,
कधी फाटका आत तर कधी फाटका बाहेर आहे,
कामगार आहे मी तळपती तलवार आहे,
सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे.
कामगार म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजे कामगार अशी संकल्पना आहे खरतर ज्याच्या जीवनामध्ये संघर्ष नाही त्याचं जीवन संपलं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. एका शायरने अतिशय सुंदर म्हटंले आहे,
ना संघर्ष ना तकलीफ क्या मजा है जिने में जब आग ना हो सिने मे..!
कामगार नेते श्री संतोष (अण्णा) बेंद्रे यांचा या संघर्षमय जीवनामध्ये आपण सर्वजण साक्षीदार आहात या पुढील काळातही आपण सर्वजण मिळून त्यांच्यासोबत राहुन कामगारांच्या न्याय हक्कासाठी उभारलेल्या या लढ्यामध्ये साथ देऊयात.
श्री. संतोष (अण्णा) बेंद्रे साहेब यांनी कामगारांना प्रति दिलेले योगदान हे उत्तरोत्तर वाढत जावो, अनेक असंघटित कामगारांना संघटित करून न्याय देण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडो, कामगारांचे कल्याण होऊन कामगारांना बळ मिळो ही सदिच्छा आज त्यांच्या जन्मदिनी व्यक्त करून या कार्यासाठी आई तुळजाभवानी त्यांना उदंड आणि निरोगी देवो ही प्रार्थना करतो.
ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.स
समन्वयक- शांतिब्रम्हश्री एकनाथ महाराज मिशन (पैठण)
संस्थापक अध्यक्ष- १) वारकरी मंच.२) SDRS NGO
अभियान प्रमुख- व्यसन मुक्ती अभियान.
मो.नं.९८९००१३५२०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा