पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या Online परिक्षेत सहभागी व्हावे तरुणाईला आवाहन. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या Online परिक्षेत सहभागी व्हावे तरुणाईला आवाहन - समन्वयक  (पिंपरी चिंचवड) ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.  शांतिब्रम्ह एकनाथ महाराज मिशन (पैठण) संचलित Online वारकरी संप्रदाय अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सकल संतांची चरित्रे आपणास वाचण्यास मिळणार आहे. संतांच्या चरित्राच्या माध्यमातून आपणास ज्ञान तर मिळणारच आहे. या शिवाय आनंद ही मिळणार आहे. यासाठी आपल्याला कोठे ही जाण्याची आवश्यकता नाही. आपल्या स्मार्ट फोन च्या माध्यमातून हा अभ्यासक्रम आपण ही Online पध्दतीने पुर्ण करु शकता. यातुन आपला बहुमूल्य वेळ वाचवुन आपण आहे त्या ठिकाणाहुन हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. या अभ्यासक्रमात कोणत्याही जाती धर्म पंथ वर्ण चा संत वाड्मंयाची आवड असलेला मनुष्य सहभागी होवू शकतो. खालील लिंक वर जाऊन आजच प्रवेश घ्यावा. http://santeknath.org/eknath/index.php अधिक माहितीसाठी संपर्क. 9960355522/8805010791 तरूणाईने संत विचारांच्या सानिध्यात येण्याची खय्रा अर्थाने गरज असल्या कारणाने......! तरूणांना मी आवाहन करतो की आपला बहुमूल्य वेळ हा योग्य मार्गी लावण्यासाठी आपल्या जवळील स्मार्ट फो

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

इमेज
अभिष्टचिंतन. 24 एप्रिल हा कामगार नेते श्री संतोष (अण्णा) बेंद्रे साहेब यांचा जन्मदिवस. खरं तर कामगार क्षेत्राला आत्तापर्यंत अनेक विचारवंतांचे आणि निडरपणे काम करणाऱ्या कामगार नेत्यांचे नेतृत्व लाभलेले आहे. परंतु जेवढे कामगार नेते होऊन गेले या कामगार नेत्यांनी आपली दुसरी फळी म्हणजे आपल्या नंतर हा वारसा दुसऱ्या पिढीकडे नेतृत्वाचा जाऊन दिला नसल्यामुळे आणि राजकीय हव्यासापोटी कामगार क्षेत्राचा बाजार मांडला गेल्यामुळे अल्पावधी काळामध्ये कामगार क्षेत्र हे लयास मिळायला सुरुवात झाली. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर कामगार नेत्यांनी आज पर्यंत फक्त कार्यकर्ते घडवले परंतु कामगार क्षेत्रामधून एखादा कामगार नेता घडत आलेला नाही ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. एका ठिकाणी काही वयस्कर लोक शेतामध्ये धान्य पेरत होती त्यावेळी बाल वयात असलेल्या भगतसिंग ने ही पेरणी चालू असताना एका वयस्कर माणसाला विचारलं की तुम्ही काय करत आहात. त्यावर तो वयस्कर माणूस म्हणाला आम्ही धान्य पेरत आहे. हे धान्य जमिनीमध्ये पेरल्यानंतर माझ्याकडं असे भरपूर धान्य तयार होईल आणि मी उपाशी लोकांची भूक भागू शकेल हे वाक्य कानी