नो सांता By- Nilesh Konde-Deshmukh
आमच्या शिखांच्या परंपरेत एका संताने आपल्या जिवलग मित्र बंता सोबत ( संता सिंह बेअंत सिंह ) अतुलनीय पराक्रम दाखवून नादिरशहा आणि अहमदशहा अब्दाली या दोन अफगाणी लुटारूच्यां नाकात चांगलाच दम आणला होता. पानिपतचे युद्ध संपल्यानंतर अब्दालीचे सैन्य जाताना वाड्या वस्त्यांवर जाऊन लूटमार करत असत, स्त्रियांवर बलात्कार करत असत, मुलांना व माणसांना घेऊन जाऊन गुलाम बनवत असत. अशावेळी या दोन महान शुरांनी (संता बंतांनी) बरोबर रात्री 12 च्या ठोक्यावर छापे मारून अब्दालीला जेरीस आणले होते. परंतु सत्य इतिहास आपल्याला माहित नसल्याने आपण नेहमी संता आणि बंता विनोद होताना उघड्या डोळ्यांनी पाहत बसतो.
शिवाजी महाराजांच्या काळात देखील अशीच एक जोडी होऊन गेली ती जोडी म्हणजे संताजी-धनाजी ची.
या दोघांनी जवळपास 17 वर्षे औरंगजेबासारख्या बलाढ्य मोगली फौजे विरुद्ध लढा दिला. देवाच्या सैन्यांच्या घोड्यांना देखील पाणी पिताना संताजी धनाजी पाण्यामध्ये दिसायचे. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर संताजी धनाजी यांनी हा लढा महाराष्ट्राच्या बाहेर देखील चालू ठेवला आणि आपल्या पराक्रमाचे मोहर उमटवली.
त्यामुळे अशा काल्पनिक सांताच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या इतिहासामध्ये होऊन गेलेल्या संतासिंग- बेअंतसिंग आणि संताजी-धनाजी चा अभ्यास प्रत्येकाने करावा असं मला वाटतं.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा