सर्वांना विनंती आहे. कृपया जिथे शक्य होईल तिथं वृक्षारोपण करा.- ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर.

लेख अवश्य वाचावा
मो.नं.९८९००१३५२०

झाडे लावा झाडे जगवा.🌴🌴🌲🌲

😇स्कन्द पुराणात एक अद्भुत श्लोक आहे.

अश्वत्थमेकम् पिचुमन्दमेकम्
न्यग्रोधमेकम् दश चिञ्चिणीकान् ।
कपित्थबिल्वाऽऽमलकत्रयञ्च. पञ्चाऽऽम्रमुप्त्वा नरकन्न पश्येत्।।

अश्वत्थः = पींपल
पिचुमन्दः = कडूनिंब
न्यग्रोधः = वट वृक्ष
चिञ्चिणी = चिंच
कपित्थः = कवठ
बिल्वः = बेल
आमलकः = आवळा
आम्रः = आंबा(उप्ति = झाडे लावणे)

जो कोणी या झाडांची लागवड करेल ,त्यांची निगा राखेल त्याला नरकाचे दर्शन होत नाही.
हे न अनुसरल्यामुळे आपल्याला दुष्काळ स्वरूपात नरकाचे दर्शन घडते आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही आता तरी चुका सुधारू.
गुलमोहर निलगिरी सुबाभूळ ही झाडे आपल्या देशातील पर्यावरणाला घातक आहेत.
तरी पाश्चात्यांचे अंधानुकरण करून अगदी पर्यावरणाच्या बाबतीत देखील ज्या चुका घडल्या त्या वड, पिंपळ,आंबा चिंच आदी झाडे लावून पुढच्या पिढीला निरोगी आणि सुजलां सुफलां पर्यावरण देण्याचा प्रयत्न करू.🌱🌱🌳🌳

दुष्काळाचे खरे कारण
पिंपळ, वड आणि लिंब हि झाडे लावणे बंद केल्याने हो आपल्याला विचित्र वाटेल, परंतु हे सत्य आहे.
(पिंपळ कार्बन डायऑक्साइड १००% शोषून घेतो, तर वड ८०% आणि नीम ७५% शोषतो आणि हि झाडे परिसराला थंड हवामान तसेच ऑक्सिजन देऊन नैसर्गिक ताजेतवाने करण्याचे काम करतात).

आपणच लोकांना खुश करण्यासाठी ह्या झाडांना लावणे टाळले आणि उलट यूकेलिप्टसची (नीलगिरी) झाडे लावण्यास सुरुवात केली.यूकेलिप्टस फार पटकन वाढते आणि दलदलिची जमीन कोरडी करण्यासाठी हे झाड लावले जाते. ज्यामुळे जमीन जलविहीन होते. गेल्या ४० वर्षांपासून हे वृक्ष सर्वमहामार्गांवर दुतर्फा लावले गेले आहेत. त्यामुळे नैसर्गिक ताजेतवाने न राहिल्याने, उष्णता वाढून वेगाने पाण्याची वाफ होत आहे.

पिंपळाला झाडांचा राजा म्हणतात.
त्याच्या स्तुती मध्ये एक श्लोक आहे -
मूले ब्रह्मा त्वचा विष्णु शाखा शंकरमेवच!!
पत्रे पत्रे सर्वदेवायाम् वृक्ष राज्ञो नमोस्तुते!!
याचा अर्थ समजला गेला पाहिजे.

येत्या काही वर्षांत प्रत्येक ५०० मीटर अंतरावर एक एक पिंपळ, वडाचे झाड लावले तर प्रदूषणमुक्त भारत होईल
या जीवन-वृक्षांची जास्त झाडे लावा आणि नीम आणि वडाची झाडे लावा. ज्यांच्याबाजूला जागा असेल तुळस लावा
या आपण सर्वांनी एकत्रितपणे आपल्या "भारताला " नैसर्गिक आपत्तीतून वाचवू या.

सर्वांना विनंती आहे. कृपया जिथे शक्य होईल तिथं वृक्षारोपण करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh