गाथा अभंग निरुपण By Nilesh Konde-Deshmukh
जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय.
अर्थ.
या जगात कोणी आमची निंदा करून आम्हाला मारो अथवा कोणी आमची स्तुती / वंदन / नमस्कार करून आमची पूजा करोत,
आम्हाला त्याचे सुख ही नाही दुःखही नाही. मी सुख दुःख पासून वेगळा आंनदरूप आहे.
या दोन्ही पासून लांब अलिप्त आहे.
प्रारब्धभोगाप्रमाने सुख दुःखे प्राप्त होतात, त्याचा समत्वभावाने स्वीकार करावा.
जगतगुरु तुकोबाराया म्हणतात आमच्या हृदयात आता सुख दुखाना जागाच नाही.
होणारी सुख दुःखे माझी आहेत अ
से न मानता ती सर्वव्यापक जनार्दन नारायणाला प्राप्त होतात असे मी मानतो.
म्हणजेच जी कांही दुःख सुख होतात ती आपली म्हटले तर ते जाणवणार जर आपण ती आपली नाहीच असे जर मानून जगलो तर त्याचा काहीच परिणाम होणारच नाही तर ती नारायणाच्या ठिकाणी लय पावतात.
ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर
मो.नं.९८९००१३५२०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा