मुख्य सामग्रीवर वगळा

ब्राम्हण तो बहाना है - By Nilesh Konde-Deshmukh.

ब्राम्हण तो बहाना है असल मे हिंदू धर्म को मिटना है..! #B5

हा लेख वाचून सर्वच ब्राह्मणांवर टीका करणाऱ्या जातीयवादी मंडळींच्या डोक्यात प्रकाश पडेल हि अपेक्षा आहे.

जसे मुस्लिम धर्मामध्ये मौलाना, ख्रिश्चन धर्मामध्ये फादर, बौद्ध धर्मामध्ये बौद्ध भिक्षुक तसेच आमच्या सनातन म्हणजे हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण कोणाला काही अडचण?

बहुजनवादी फुले-शाहू-आंबेडकर यांचे ब्राह्मण प्रेम.

आजकाल बर्याच जणांना ब्राह्मण द्वेष करताना जोतीराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आधार घेण्याची गरज वाटू लागली आहे.

या प्रभूतींनी ब्राह्मणांना विरोध केला हे जरी खरे असले तरी त्यांनी सरसकट सर्वच ब्राह्मणांना विरोध केला नाही, कित्येक ब्राह्मणांची मदत त्यांनी घेतली होती. परंतु आजच्या यांच्या काही अनुयायांना मात्र हे खरे वाटत नाही. त्यांनी हे वाचलेच पाहिजे.

महात्मा जोतीबा फुले –

१) जोतिबांचे प्राथमिक शिक्षण हे पंतोजींच्या शाळेत झाले होते, तसेच त्यांचे कितीतरी मित्र हे ब्राह्मण होते.

२) मुलींच्या शाळेची सुरुवात त्यांनी भिडे वाड्यात केलेली होती.

३) त्यांनी घडवलेला सर्वात पहिला विधवा विवाह हा गोखले बागेत झालेला होता.

४) स्वामी दयानंद सरस्वती हे जन्माने ब्राह्मण होते
स्वामी दयानंद सरस्वती यांची पुण्यातून मिरवणूक काढण्यासाठी जोतिबांनी मदत केली होती.

५) जोतिबांनी एक ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला होता आणि मृत्युसमयी आपली सर्व संपत्ती हि त्या मुलाला दिलेली होती.

६) जोतीराव फुलेंचे बालपणापासूनचे मित्र भांडारकर यांचे फुलेंनी ‘शिवाजी महाराजांच्या पोवाडय़ात’ जाहीरपणे आभार मानले.
जोतीबा म्हणाले ‘‘हा पोवाडा एकंदर तयार करतेवेळी माझे लहानपणीचे मित्र भांडारकर यांनी इतर दुसऱ्या लोकांसारख्या पायात पाय न घालता मला या कामात नेहमी हिम्मत देऊन वारंवार माझ्या कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे.’’ (म.फु.स.वा. पृ. ४४) असे कृतज्ञतेने १८६९ साली नमूद करणाऱ्या जोतीरावांनी आपल्या या जिवाभावाच्या नि आयुष्यभराच्या मित्राची स्वत:च्या मृत्युपत्रावर १८८७ साली साक्ष घेतलेली आहे. (म.फु.स.वा. पृ. ६४८) साक्षीदार म्हणून जवळच्याच व्यक्तीची निवड केली जाते, कुणा ऐर्यागैर्याची नाही. (संदर्भ – प्रा. हरी नरके)

राजर्षी शाहू महाराज –

१) बालगंधर्व – नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व हे शाहू महाराजांच्या गळ्यातील जणू ताईत होते. बालगंधर्वांना कमी ऐकू येत असे, या त्रासातून मुक्तता होण्यासाठी शाहू महाराजांनी त्यांना मिरज येथे उपचार घेण्यास मदत केली. शाहू महाराजांनी त्यांना किर्लोस्कर नाटक मंडळीशी ओळख करून दिली ज्यातून पुढे बालगंधर्व हे कलाकार म्हणून पुढे आले.

२) लोकमान्य टिळक – लोकमान्य टिळक आणि शाहू महाराज यांच्यात वैचारिक मतभेद होते, परंतु द्वेष नव्हता. दोघांमधील एका खटल्यात शाहू महाराजांनी स्वतःविरुद्ध असलेली काही कागदपत्रे टिळकांच्या हातात पडतील अशी व्यवस्था केली. याबाबत त्यांना पुढे विचारणा केली तेव्हा ते उद्गारले, “तो एवढा राष्ट्रहिताचे काम करत असेल मी त्यामध्ये का यावे…?”
लोकमान्य टिळक यांचे निधन झाले त्यावेळी शाहू महाराजांना हि बातमी काळातच ते धक्का बसून अर्ध्या ताटावरून उठले होते. त्यावेळी त्यांनी टिळकांच्या संदर्भात काढलेले “ऐसा लढवय्या पुन्हा होणे नाही” हे उद्गार प्रसिद्ध आहेत.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर –
१) बाबासाहेबांचे आडनाव हे त्यांच्या एका ब्राह्मण शिक्षकाने त्यांच्यावरील प्रेमापोटी त्यांना दिलेले आडनाव आहे हे बर्याच जणांना माहिती नसते.

२) मनुस्मृती जाळताना ती मुळामध्ये एक ब्राह्मणाच्या हस्ते (जी.एन. सहस्त्रबुद्धे) जाळलेली आहे. खुद्द बाबासाहेबांनी नाही. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार करताना मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य स्मृती या सर्व स्मृतीमध्ये उच्च स्थानावर आहेत असे नमूद केलेले आहे.

३) स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेल्या अस्पृश्यता निवारणाच्या कामाबद्दल बाबासाहेबांनी आपले मुखपत्र जनता मधून त्यांची तुलना साक्षात गौतम बुद्धांशी केलेली आहे.
एवढेच नव्हे तर रानडे यांची आणि टिळकांच्या पुत्राचीदेखील त्यांनी स्तुती केलेली आहे.

कटुसत्य
समाजासाठी झटून देखील ज्यांचे नाव नाकारले जाते अशा वीरांसाठी :

बुद्धीप्रामाण्यवादाचा सर्वप्रथम स्वीकार केला ते चार्वाक ब्राह्मणाचे.

केला ज्यांनी प्रथम जातीभेदावर घाव ते
महात्मा बसवेश्वर ब्राह्मणाचे.

गीता केली सर्वास मोकळी ते
ज्ञानेश्वर ब्राह्मणाचे.

प्रथम जेऊ घातले आपल्या घरी पद-दलितास ते एकनाथ ब्राह्मणाचे.

घराचा हौद दलितांना प्रथम मोकळा केला तो एकनाथ ब्राह्मणाचे.

दलितांसाठी झटली जी प्रथम स्त्री त्या
संत बहिणाबाई ब्राह्मणांच्या.

सर्वप्रथम धनगरास स्वपंक्तीत जेवायास घेऊन बसले ते वीर बाजीराव पेशवा ब्राह्मणाचे.

सर्वप्रथम विधवा विवाह केला ते
महर्षी कर्वे ब्राह्मणांचे.

विधवांच्या दुखः ला फोडली वाचा ते
आगरकर ब्राह्मणांचे.

दलितांच्या हक्कासाठी सर्वांशी लढले ते सावरकर ब्राह्मणांचे.

ब्राह्मण लोकांनीच सर्वप्रथम जातीभेद आणि अनिष्ठ रितीना विरोध केला आहे त्यावर तयार केलेले हे गद्य काव्य :

एक ब्राह्मण ज्याने पृथ्वीवरील अधर्मी क्षत्रियांचा 21 वेळा संहार केला आहे ते भगवान परशुराम.

एक ब्राह्मण होता ज्याने निजाम, मोगल, इंग्रज, पोर्तुगीज यांचे कर्दनकाळ ठरुन दिल्ली जिंकून औरंगजेबाचे साम्राज्य उध्वस्त केलेे. संभाजी महाराजांच्या हत्येचा सूड घेतला. 41 लढाया लढून शंभर टक्के यश मिळविणारा आणि एकही लढाई न हरणारे थोर धुरंधर, अपराजित योद्धे बाजीराव पेशवे.

एक ब्राह्मण होता ज्याने सतत २१ तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतांनाही मोठ्या हिंमतीने ६ ते ७ तास घोडखिंड लढविली कारण स्वराज्य निर्मिती साठी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप, सुरक्षित राहायला हवेत. ते वीर बाजीप्रभु देशपांडे.

एक ब्राह्मण होता ज्याने ब्रिटन मधून भारतात शस्त्रे पाठविली, ती शस्त्रे नाशिकमध्ये क्रूर ब्रिटीश अधिकारी यांना मारण्यासाठी वापरली होती. त्याने २७ वर्षे अंदमानात काढली. ते स्वात्यंत्रवीर विनायक दामोदर सावरकर.

एक ब्राह्मण होता, ज्याने इंग्रजां विरुद्ध सशस्त्र क्रांती करण्याचा प्रयत्न केला होता त्याला इंग्रजांनी एडन येथे फाशी दिली. ते वासुदेव बळवंत फडके.

एक ब्राह्मण होता ज्याने १८९९ मध्ये पुण्यात गणेश खिंड रस्त्यावर रँड साहेबाचा गोळ्या घालून वध केला होता आणि स्वतः फाशी गेला होते ते चाफेकर बंधू

एक ब्राह्मण अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या
स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्य सेनानी असे बाळ गंगाधर टिळक.

ह्या सर्व महान व्यक्तींना शतशः प्रणाम.

टिप:- मी ब्राह्मण नाही, मात्र ब्राह्मणांच्या आडून हिंदु धर्म, देव आणि देशाचा इतिहास विकृत करणा-याचे मनसुबे उधळले जावेत, म्हणून ही पोस्ट टाकली आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh