स्वार्थीपणा एकत्र कुटुंब पद्धती साठी हानिकारक. - By Nilesh Konde-Deshmukh.

भारतीय संस्कृती खूप मजबूत आहे त्याचबरोबर भारतीय संस्कृती प्राचीन आहे.

खरंतर ही संस्कृती टिकवण्याचा मजबूत आणि योग्य असा एकमेव मार्ग म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होय असं मला वाटतं.

परंतु आधुनिक युगामध्ये विभक्त कुटुंब पद्धती उदयास येऊन खरंतर या संस्कृतीला सुरुंग लावण्याचे काम नवा विचाराने झाल्याचे आपल्यास पाहायला मिळते.

प्रस्तुत लेखात आपण विभक्त कुटुंब पद्धतीमुळे होनारे नुसकान, कुटुंबाची होणारी वाताहत, त्यातून त्या घरातील लहान मुलांच्या बालमनावर होणारे परिणाम, आपल्याच नात्यांसोबत होणारे कटू संबंध, विभक्त होण्याची कारणे आणि आपल्यातीलच काही लोकांनी घरफोडी वृत्तीला दिलेला थारा या सर्व गोष्टींमुळे समाजामध्ये आपली पत ढासळुन आपण आर्थिक व वैचारिक दृष्ट्या अधोगतीला जाण्याची कारणे थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे.

घर खरच कोणामुळे फुटते..?

बहूतेकवेळा याचे खापर स्त्रियांच्या माथी मारले जाते.
कोणाचेही घर स्त्रिमुळे फुटत नाही तर
ते स्वार्थामुळे फुटत असते, मग
तो कुटुंबातील स्त्री, पुरूष कोणातही निर्माण होऊ द्यात. मनात स्वार्थ निर्माण झाला की त्याला फक्त समर्थनाची गरज असते, मग
पतीला समर्थन देणे हे पत्नीचे कर्तव्य असते आणि असे कर्तव्य पार पाडण्यासाठी स्त्रि अति उत्साही बनते आणि सर्वांच्या डोळ्यावर येत.
खरेतर हा फक्त धूर असतो ,
स्वार्थाची आग पुरूषाच्या हृदयात लागलेली असते.
माणसाला दूरून धूर दिसतो ,आग दिसत नाही .
स्त्रिने कितीही प्रयत्न केला आणि
घरातील पुरूष निःस्वार्थी असला तर तिला घर कधीच फोडता येत नाही .
कैकयीच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला , पण
दशरथ निःस्वार्थी होते , त्यांनी जीवन संपवले , पण घर फुटू दिले नाही ,
वडील्यांच्या आज्ञेनुसार काहीच चुक आणि दोष नसताना श्रीराम यांनी वचनासाठी विनातक्रार आनंदाने वनवास स्वीकारला , पण
भरतानेही त्यांच्या पादूका सिंहासनावर ठेऊन सेवकाप्रमाणे राज्य सांभाळले , कारण
हे सर्व पुरूष निःस्वार्थी होते,
कैकयीच्या स्वार्थाचा आणि प्रयत्नांचा काहीही उपयोग झाला नाही , उलट तिलाच घरात एकत्र रहावे लागले आणि आयुष्यभर निंदा सहन करावी लागली .
पुरूष निःस्वार्थी असेल तर
जगातील कोणत्याही स्त्रिला घर फोडता येत नाही .
पण जर पुरूष स्वार्थी बनला तर
कोणत्याच स्त्रिला घर एकत्रित ठेवता येत नाही .

धृतराष्ट्राच्या मनात स्वार्थ उत्पन्न झाला ,
गांधारी आणि कुंती या दोघींनाही स्वार्थ नव्हता , या दोघींनीही घर एकत्र ठेवण्याचा प्रयत्न शेवट पर्यंत केला , पण त्यांनाच काय
भगवान श्रीकृष्णांनी प्रयत्न केला तरी सुध्दा घर आणि कुळ वाचवता आले नाही .

पूरूषाच्या मनात स्वार्थ तयार झाला तर देवाला सुध्दा घर वाचवता येत नाही , यात
स्त्रिला दोष देऊ नका .
एक भाऊ दुसऱ्या भावाची जेवणासाठी वाट पहातोय
हा आईवडीलांसाठी सर्वात सुख आणि समाधानचा क्षण असतो आणि
आईवडील हयात असताना घरातील वाटणीचा दिवस
हा त्यांच्या जीवनातील सर्वात दुःखद क्षण असतो .
त्यांना काय द्यायचे हे आपल्या हातात असते ,
आपल्या स्वार्थासाठी
उगीचच घरातील स्त्रिला बदनाम करू नका .
घर कधीच स्त्रिमुळे फुटत नाही ,
ते स्वार्थामुळे फुटते .
आपल्या घराचे घरपण हे स्त्रिमुळे टिकून असते,
ज्या घरातील पुरूष,खंबीर व निस्वार्थी असेल तर त्याचे घर कधिही फुटू शकत नाही.

ज्या घरातील कर्ता अथवा ज्या घरातील तरूण हे घरफोडी वृत्तीला खतपाणी घालत राहतील, घरफोडी वृत्तीच्या सानिध्यात येतील, किंवा आपला स्वाभिमान गहाण ठेवून ज्यांनी घर फोडण्याची काम केली अशा लोकांना जावुन मिळतील त्याचं पतन निश्चित आहे.

खालील गोष्टी अमलात आणा.

आपली घर सांभाळा मजबूत करा,

भावा भावांनी एक व्हा,

महिलांना एकत्र कुटुंब पद्धतीचे फायदे जाणून द्या.

बाहेरील वाईट शक्तीला तुमच्या कडे थारा देऊ नका,

समर्पणाची आणि समर्थनाची भावना हृदयात सतत तेवत ठेवा.

मनाचा मोठेपणा वाढवा,

माफी मागायला शिका.

मला नक्कीच खात्री आहे असं केले तर आपले घर आपण योग्य रित्या संभाळु शकतो.

सर्वांची घरं अबाधित राहो व अबाधित राखण्यासाठी लागणारी सद्बुद्धी ईश्वर आपणास प्रदान करो हीच प्रार्थना आणि शुभेच्छा ही.

ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर

मो.नं.९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh