कारखानदारांनी शेतक-यांचा आदर्श By-Nilesh Konde-Deshmukh.

रक्ताचे पाणी करून आपल्या घामावर कंपनीची भरभराट करून नुस्ती कंपनीच नाही तर राष्ट्राची ही प्रगती करणारा कामगाराला अडचणीच्या काळामध्ये चार-पाच महिने पोसु शकत नाही ही खुप मोठी खेदाची बाब आहे.
कामगार प्रती असलेला स्नेह जर मालक वर्गाने जोपासला तर कामगार वर्गाला निश्र्चितच एक प्रकारे नवचैतन्य बहाल होईल आणि भविष्यात तो कामगार आपल्या कंपनीशी मालकाशी आणि आपल्या कामाशी आज जितक्या इमान इतबारे नी काम करत आहे त्याच्याही पुढे जाऊन आपली कामाप्रती बांधिलकी नक्किच वाढविल यात काय शंका नाही.
बोटावर मोजण्याइतकाच मालक वर्ग मंदीच्या काळात कामगारांना सांभाळतो, काही मालक कामाचे तासच कमी करतात, काही पगार कपात करतात तर काही मालक वर्ग काम करुन ही पगार कपातीची कुह्राड कामगारांवर चालवताना दिसतात.
एकीकडे उद्योजकांना बळ देण्यासाठी जगात मालक फेडरेशन उभी राहुन प्रशासनावर अंकुश ठेवता श असताना दुर्दैवाने दुसरीकडे आपल्या तुंबड्या भरणाय्रा ही कामगार संघटना उदयास येत आहे.
अशा या भयान परिस्थितीत कारखानदार, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा आदर्श घ्यावा.
चार महिने दुध देणारी गाय शेतकरी गर्भार व भाकड काळात १२ महिने सांभाळतो.
केवळ उन्हाळ्यात फळ देणारा आंबा ८ महिने सांभाळतो..
बैलाचे काम नांगरट,पेरणी , कुळवणी,वखरणी साठी हंगामी लागते पण १२ महिने त्यांना सांभाळतो. त्यांचा खुराक चारा पाणी यामध्ये कधी भेदभाव नसतो.
दुष्काळ तर कायम पडतो म्हणून कुणाचा खुराक चारा पाणी शेतकरी थांबवत नाही.. खरीप व रब्बी हंगामात विहीरींना पाणी असते.
मजूराला खूप काम असते पण उन्हाळ्यात विहीरीचे पाणी कमी होते शेतात पीकं नसत म्हणून मजूरी अर्धी देत नाही.
कधीतरी दहा वर्षात एकदा शासन कर्ज माफी देते.
पण शेतकऱ्याने मजुराला व जनावरांना वाऱ्यावर सोडल्याच्या घटना नाहीत.
कारखानदार व्यापारी तोट्यात धंदा आल्यास दिवाळखोरी जाहीर करतो, फर्म बंद करतो नवीन फर्म चालू करतो. पण शेतकऱ्याच्या उताऱ्यावर बोजा असतो त्याला व्यवसाय बदलता येत नाही.
दोन महिने लॉकडाऊन मध्ये कारखाने,दुकाने बंद काय राहीली तर जणू दुष्काळ पडला.
नोकर,पगार कपात
पुढे कामाचे तास वाढवणार..!
मालक असावा तर बळीराजा सारखा. शासन, कारखानदार, व्यापारी सगळे शोषण करतात शेतकऱ्याचे, पण खरा राजा शेतकरीच अरे एकदा करून पहा तोट्यात व्यवसाय, तुम्ही तर कामगारांचा जीव घ्याल कायम तोट्यात व्यवसाय करूनही दारातली भाकड गाय किंवा म्हातारं कुत्रं शेतकरी उपाशी मरू देत नाही.
जय जवान
जय किसान
जय कामगार
Nilesh Konde-Deshmukh
9890013520
Very nice and truthful story
उत्तर द्याहटवा