सोमरस आणि दारू गैरसमज. By-Nilesh Konde-Deshmukh
अनेक दिवसांपासून श्रीमद भगवद गीतेमधील एका
श्लोकावर काहीही माहिती सोशल मिडियावर फिरवली जात आहे. जे संपूर्ण आयुष्यात वेदांना थोतांड म्हणतात आज तेच भगवद गीते बाबत बोलत आहेत यावर हसू च येत. ज्या गीतेच्या श्लोका बाबत टिप्पणी दिली जात आहे मित्रांनो ही भगवद गीता तीच आहे जीचे भाषांतर ज्ञानेश्वरी म्हणुन माऊलींनी केले.
आजही कोर्टात भगवद गीतेवर च शपथ घेतली जाते.. !!
असो..
सोमरस म्हणजे काय त्याचा आधी प्रमाणित अर्थ :
सोमरस ही अस पेय आहे जीला औषिधीय गुणधर्म आहेत. सोमरस प्राचीन काळात शरीर ठीक ठेवण्यासाठी होत.
आजही आपन पाहू शकतो अनेक प्रकारच्या औषधा मध्ये अल्कोहोल contain हे असतेच त्याचा असा अर्थ होत नाही की औषध ही नशे साठी घेतली जातात ती मानवाच्या भल्या साठीच असतात !!
जर सोमरस नशे साठी घेतला जात असेल तरी पूर्वीच्या काळी कोन आजच्या सारख पिऊन पड़त नव्हते तर त्या नंतर ही ते देवाचे स्मरण करत
आजच्या काळात आज अशी अनेक कठोर श्रमाची काम आहेत जी नशे शिवाय सहसा कोण करत नाही !! मग त्या काळी ही सोमरस काही तरी विचार करूनच तयार केला असेल !!
जर त्या काळी जर सोमरस पिऊन ही लोक 100 च्या पार जगायची आता सध्या प्रगतशील 21 व्या शतकात मनुष्य किती जगतो. 50-60-70 जास्तीत जास्त.

सोमरस
भगवद्गीतेत सोमरस चा श्लोक 9 वा अध्याय, 20 श्लोक आहे. तेथे श्रीकृष्ण सांगत आहेत जे वेदांचा अभ्यास करणारे आणि सोमरस पिनारे यांच काय होत त्यावर बोलत आहेत याचा अर्थ असा नाही की ते सोमरस पिण्याचा सल्ला देत आहेत हे आधी
निट समजून घ्या !! जर असला वाइट सल्ला ते देत असतील तर गीतेवर ज्ञानेश्वरी ज्ञानराजांनी लिहली असती का ? यावर निट विचार करा आणि सोमरस चा पुढचा श्लोक ही विचारात घ्यायला हवा !!
ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति।
एव त्रयीधर्ममनुप्रपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते।।9.21।।
म्हणजेच जे हा रसपान करुण इंद्रिय उपभोग करतात्त आणि जेव्ह्या पुण्यकर्म संपते तेव्हा त्यानां पुन्हा जन्म-मृत्यु फेरयात परत अड़कावे लागते !!
सर्वात महत्वपूर्ण : ज्ञानेश्वर महाराजनी या श्लोकावर ओवी क्रमांक : 307 ते 327 यावर भाष्य केलय.विरोध अथवा निंदा मात्र कुठेच नाही.

सोम वनस्पती.
समज गैरसमज
अनेकदा सोमरसाची तुलना दारूशी केली जाते. प्राचीन काळात देव-देवता सोमरस प्राशन करत असल्याचे संदर्भ आढळतात. परंतु, सोमरस आणि दारूत साधर्म्य असल्याचे सांगत पिणा-यानी आपला मार्ग मोकळा केलाय. शिवाय, मद्यपानाचं देव-देवतांशी तादात्म्य जोडून वैध असल्याचा आविर्भावही त्यांच्यात दिसून येतो. परंतु, वैदिक काळात पंचशुद्धीला अधिक महत्व दिलं जात होतं. चारित्र्य संपन्नतेला प्राधान्य दिलं जायचं. त्यामुळे उन्माद आणणारं पेय त्या काळात सेवन केलं जातं होतं का? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. म्हणूनच सोमरस नक्की काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे.
धार्मिक ग्रंथांमधून मद्यपानाची, उन्माद आणणा-या पदार्थाच्या सेवनाची सर्वत्र निंदाचं करण्यात आली आहे. वेदांमध्ये सोमरसाला अनन्य साधारण महत्व आहे. सोम एक औषधी वनस्पती असल्याचं वेद-पुराणातील उल्लेखांमधून स्पष्ट होते. सोम या वनस्पतीला चमत्कारी वनौषधी असंही संबोधलं जातं.
ऋग्वेदामध्ये मादक पदार्थाविषयी काय म्हटलंय.
।।हृत्सु पीतासो युध्यन्ते दुर्मदासो न सुरायाम्।।
सुरा म्हणजे नशा आणणारा पदार्थ. सुरापान करणारे किंवा मद्यपान करणारे नेहमीच भांडण, मारामारी आणि हिंसा करतात.
ऋग्वेदामध्ये सोमरसाविषयी काय म्हटलंय.
।।शतं वा य: शुचीनां सहस्रं वा समाशिराम्। एदुनिम्नं न रीयते।। (ऋग्वेद-1/30/2)
दही आणि दुग्ध मिश्रीत सोमरसाचे अनेक घडे इंद्रदेवाला प्राप्त होवोत, असं आवाहन करण्यात आलंय. सोमरसात दही-दूध मिश्रीत करण्याचं म्हटलंय. दारूत दूध-दही घातले जात नाही, हे सर्वश्रुत आहे. भांग दूध घालून पिण्यात येते. पण त्यात दही घातल्याचे आजवर तरी ऐकण्यात आले नाही.
।।औषधि: सोम: सुनोते: पदेनमभिशुण्वन्ति।- निरुक्त शास्त्र (11-2-2)
सोम एक औषधी आहे. ज्याला कुटून आणि दळून त्याचा रस काढण्यात येत असे. दुग्ध मिश्रीत सोम म्हणजे ‘गवशिरम्’ तर दही मिश्रीत सोम म्हणजे ‘दध्यशिरम्’ बनवले जात होते. शुद्ध तुप आणि मध घालूनही सोमरस तयार करण्यात येत असे. याचा अर्थ असा की, मदिरा, सुरा, भांग आणि दारू या कशातही दही, मध आणि तुप टाकण्यात येत नाही. उलटपक्षी सोम, दुध, दही, तुप आणि मध यांच्या मिश्रणातून सोमरस तयार करण्यात येत असे. म्हणजे, सोमरस हे दारू किंवा भांग असा मादक-उन्माद आणणारा हानिकारक पदार्थ नव्हे, हे लक्षात घ्यायला हवं. आता दारू ही हानिकारक आहे, असं कोणं म्हणतो? असा वाद निर्माण होऊ शकतो. पण किमान भारतात दारूमुळे होणारे दुष्परिणाम पाहता, ‘हानिकारक’ हा शब्दप्रयोग याग्य आहे, असं मला वाटतं.
देव-दानवांना स्फुर्ती आणि प्रेरणा देणारा रस, असं सोमरसाचं वैशिष्ट्य होतं. इंद्र सोमरसाचं प्राशन करून अधिक पराक्रमी बनतो. म्हणून इंद्रदेवाला सोमरस अर्पण करतात.
ऋग्वेदातील एक संदर्भानूसार.
“स्वादुष्किलायं मधुमां उतायम्, तीव्र: किलायं रसवां उतायम। उतोन्वस्य पपिवांसमिन्द्रम, न कश्चन सहत आहवेषु”
म्हणजे सोम अतिशय स्वादिष्ट, मधुर आणि रसाळ आहे. सोमरसपान करणारा बलवान आणि अपराजीत बनतो. तारूण्य बहाल करणारा, सात्विक, अत्यंत बलवर्धक, आयुवर्धक, अन्नदोषाचा प्रभाव नष्ट करणारा असा हा ‘सोमरस’. शरिर रक्षण, आरोग्य प्रदान करणारा, संकटांना दूर पळविणारा, बलशाली, आनंद देणारा, संपत्ती संवर्धन करणारा, ऋषीत्व आणि अमरत्व प्रदान करणा-या सोमरसाचे असे अनेक गुणधर्म कण्व ऋषींनी सांगितले आहेत.
सोम वनस्पतीची संजिवनी वनस्पतीशीही तुलना करण्यात आली आहे. ऋग्वेदानूसार सोम वनस्पतीच्या उत्पत्तीचे दोन प्रमुख स्थान सांगितले आहेत. एक स्वर्ग आणि दुरसे पार्थिव पर्वत. अर्थात, पृथ्वीवरील पर्वत श्रृंखला. सोम अग्नीप्रमाणेच स्वर्गातून पृथ्वीवर आल्याचं ऋग्वेदात सांगण्यात आलयं. मुजवंत पर्वत (गांधार-कम्बोज प्रदेश) हे सोम वनस्पतीचे पृथ्वीवरील पार्थिव स्थान. (ऋग्वेद अध्याय सोम मंडल- 4, 5, 6) वेदांमध्ये वर्णित सोमरसची वनस्पती अफगणिस्तानातील टेकड्यांवर आढळली आहे. काही वर्षांपूर्वी ईराणमध्ये काही लोक इंफेड्रा नामक झाडाची तुलना सोम वनस्पतीशी करत असतं. तुर्कमेनिस्तानमधील तुगलक-21 मंदिर परिसरात मातीच्या काही भांड्यांमध्ये इंफेड्रा झाडांच्या लहान-लहान फांद्या आढळल्या. या भांड्यांचा उपयोग पुर्वी सोमरसाच्या अधिष्ठानाकरीता करण्यात येत असल्याचेही सांगण्यात येते. या पुराव्यांसंदर्भात पुढे संशोधनही सुरू आहे.
संकलन. वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो.नं.९८९००१३५२०
Source- सत्यमेव जयते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा