जिवनात दृष्टीकोन महत्वाचा By-Nilesh Konde-Deshmukh.

जीवन जगत असताना आपण चौकोन शिकलो त्रिकोण शिकलो षटकोन शिकलो काटकोन शिकलो परंतु जर आपण दृष्टिकोन शिकलो नाही तर आपला आयुष्य वाया गेलं समजावं.

आयुष्यामध्ये दृष्टिकोनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे ज्याच्या कडे दृष्टिकोन आहे तो यशस्वी होतोच होतो त्याचबरोबर आपला आत्मविश्वास ही वाढला जातो.

आपण नाटक पहायला गेलो तर पुढची सीट मागतो आणि सिनेमा पहायला गेलो की मागची. तुमचं जगातलं स्थान असंच सापेक्ष असत…!
ते अविचल कधीच नसतं…!
साबण बनवायला तेल हा घटक जरूरी असतोे आणि तेलाचा डाग काढायला साबणच लागतो..! हा अटळ विरोधाभास आहे…!!
जगात दोनच प्रकारची माणसं आनंदात असतात…!
वेडीे माणसं आणि लहान मुलं चांगल्या कामासाठी ध्येयवेडे व्हा आणि ध्येय साध्य झाले की लहान मुलांसारखा त्याचा आनंद घ्या…! जगण्याचा आनंद घ्या.

जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं.
काचेला ” पारा ” लावला की,
आरसा तयार होतो. पण
लोकांना “आरसा ” दाखवला की,
त्यांचा ” पारा ” चढतो.
“आरसा तोच असतो ”

फक्त त्यात ” हसत ” पाहिले की,
आपण ” आनंदी ” दिसतो,
आणि ” रडत ” पाहिले की,
आपण ” दु:खी ” दिसतो.

तसेच ” जीवन ” ही तेच असतं,
फक्त त्याच्याकडे आपला
पहाण्याचा ” दृष्टीकोन ” त्याला
” आनंदी ” किंवा ” दु:खी ” बनवतो.

” म्हणुन.. ”
” दृष्टीकोन ” महत्वाचा आहे.
दृष्टिकोन बदलला की सर्वच बदलते. जीवन बदलते दृष्टिकोन मात्र सदसद्विवेक बुद्धीतुन असावा.

संकलन : वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो.नं. : ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संजीवन समाधी म्हणजे नेमके काय. By-Nilesh Konde-Deshmukh

श्री दिलीप तांबोळकर काका साधकांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.By-Nilesh Konde-Deshmukh.

उपजे ते नाशे