औक्षण (ओवाळणे) मधुन मिळते प्रचंड उर्जा. By- Nilesh Konde-Deshmukh.

तेजोमय तेजोवलाय(ऑरा) वाढविणारे

औक्षण -ओवाळणे

Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another.

असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो न्यूटन चा नियम , माहीती आहे ”
पण –

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे.पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो माहीती आहे – एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे ,

I don’t believe this ”

अहो , न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं.
देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय ? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते ! सत् – चित्-आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही !
परमात्मा म्हणा वा एनर्जी – दोन्ही एकच “ अनादीअनंत ”

“ माझा देवावर विश्वास नाही ” हे आताशा चालतं. पण ” माझा उर्जेवर विश्वास नाही ” असे एखाद्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत म्हणून पहा. हकालपट्टीच होईल खास ! असो.

मनुष्य हा एक अनंत उर्जेच्या कणांनी बनलेला उर्जेचा गोळामात्र आहे. त्याचे अस्तित्वही उर्जा आणि त्याच्या भोवतालीही एक उर्जाच विद्यमान आहे. ज्या उर्जेला नाव आहे “ ऑरा ”
हा ऑरा जर संतुलीत असेल , तर आपले अस्तित्व संतुलीत ! हे कसे जमेल ? यावर विचार करत असताना (कदाचित्)आपल्या पूर्वजांना अनंत मार्ग सापडले – जसे स्तोत्र-मंत्र पठण , रुद्राक्ष व मंत्र धारण , अलंकार धारण , औषधी वनस्पती धारण . गंध व भस्म लेपन इ.
त्यातीलच एक महत्वाचा ’ऑरारक्षक ’ उपाय म्हणजे ’ ओवाळणे ’ अर्थात् ’ औक्षण करणे ’

कुणाचा वाढदिवस असेल,कुणी परीक्षेला चाललं असेल,कुणी महत्वाच्या कामावर चाललं असेल,कुणी काही विशेष पराक्रम करून परतलं असेल तर ’ ओवाळणे’ हा एक अगदी हमखास करावयाचा वैज्ञानिक विधी होता. आताही आहे , पण त्याचे अस्तित्व आता अंध:श्रद्धेपुरते राहीले आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की जीवजंतू-बाधा-अरिष्ट यांपासून मानवाचे संरक्षण करणे हे औक्षण विधीचे काम आहे.

प्रतिकारक क्षमता अल्प असलेली लहान मुलं,सतत कामानिमित्त बाहेर असणारी घरातली कर्तीमंडळी यांना So called Exposure पुष्कळ आहे. परीणामी त्यांच्या भोवतालचे उर्जावलय क्षीण होते.त्यामुळेच महाप्रचंड उर्जेचे लघु-रूप असलेल्या निरांजनाने – अक्षता-सुवर्ण-सुपारी इ.उर्जावस्तू वापरून अत्यंत सकारात्मकतेने आणि विशेष प्रेमादराने ज्यांचे हृदय ओथंबून आले आहे अशाच व्यक्तीने जर त्यांना ओवाळले तर आभावलय पुन्हा मजबूत होते आणि शरीरातील उर्जाकेंद्रे आणि सप्तचक्रे पुन्हा Activate होतात आणि व्यक्ती बरी होते, दुरूस्त होते आणि बाधामुक्त होते.
वारंवार आजारी पडणार्‍या आणि प्रतिकारशक्ती कमी असणार्‍या मुलांना अथवा मोठ्यांनासुद्धा या उपायाने आराम पडताना दिसतो. जरूर अनुभव घ्यावा.

श्रावणातलं पावसाळी वातावरण , आभाळी हवा आणि जीवजंतू व रोगराई यांचे वाढलेले प्रमाण , या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी-शुक्रवारी मुलांना ओवाळणे तसेच काही ना काही निमित्ताने पुन्हा-पुन्हा ओवाळणे हे विशेष संयुक्तीक आहे.
आयुष्यवान – आयुष्यमान – आयुष्यवंत अशा शब्दातून कदाचित् औक्षण आणि औक्षवंत असे शब्द तयार झाले असावेत.
त्यामुळे घरातल्या सर्वांचे जर खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर अगदी डोळसपणे काही प्रथा आपण पाळाव्यातच ! असे माझे स्वच्छ मत आहे.
त्यामागचे वैज्ञानिक तथ्य समजेपर्यंत कदाचित् उशीर होतो.म्हणून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर ’ औक्षण ’ या विषयी लिहावेसे वाटले.

जिज्ञासू आणि आक्षेप कर्त्यांचे स्वागत ! – पण ‘ Electro-somatographic scaning ’ या Test मधून प्राप्त निष्कर्षांचा अभ्यास असेल तर !!!

बाकीच्यांनी आवर्जून ओवाळून घ्या ! ओवाळा ! मोठं उर्जादायी काम आहे ते ! उर्जा अमूल्य आहे ! आणि हो ओवाळणीही घाला मोबदल्यात !

साभार- डॉक्टर सुनील थळगे.

संकलन- वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.

मो.नं.९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh