लेखणीचा सरदार. By- Nilesh Konde-Deshmukh

एका खेड्यातील या व्यक्तीने लिहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरवीचा पोवाडा थेट रशियात गाजला, तो रशियन भाषेत अनुवादित ही झाला, राष्ट्र अध्यक्षांकडुन सन्मान झाला. ही चकित करणारी किमया होती लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची. यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी वाटेगाव जि. सांगली येथे झाला.
अण्णा भाऊंच्या पोवाड्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ असो वा गोवा मुक्ती संग्राम यामध्ये चैतन्य आणले. त्यांच्या लालबावटा पथकाने लोकजागृती केली. ही चळवळ यशस्वी होण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
अण्णा भाऊंच्या साहित्याचा केंद्रबिंदू हा नेहेमीच जनसामान्य होता. त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी लेखणीचा उपयोग केला. त्यांच्या जीवनानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचा विलक्षण पगडा होता. अण्णा भाऊंच्या साहित्याने आज मराठी साहित्य दालन समृद्ध झालेय.
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातही त्यांचा न्यायासाठी लढा सुरुच होता. त्यांनी जीवनात बराच संघर्ष केला. या संघर्षमय जीवनात अलौकिक प्रतिभेचा साहित्यप्रवास हा थक्क करणारा आहे. ३५ कादंबऱ्या, १५ लघुकथा संग्रह, १२ पटकथा, ७ लोकनाट्य.. एक विदेशाचे प्रवास वर्णन.. कित्येक पोवाडे ही त्यांच्या उत्तुंग सर्वसमावेशक प्रतिभेची साक्ष देतात. या साहित्याची ताकद अशी की त्यांच्या कादंबऱ्यांवर ७ यशस्वी चित्रपट निघालेत. ‘वारणेचा वाघ’ हा यापैकीच एक.
समाजातील सामान्य व्यक्ती हे त्यांच्या साहित्यात नायक असायचे. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे समाजाचे लक्ष वेधले जायचे. तमाशाला त्यांच्या वग.. गवळण यामुळे लोकनाट्य दर्जा.. प्रतिष्ठा प्राप्त झाली.
जिथे विकास झाला अशा ठिकाणी मोठ्या शहरात कुटुंब सोडून पोटापाण्यासाठी जावे लागते. इतरांची श्रीमंती दूरुन बघत स्वतः हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. अशा नायकाच्या मनाची तगमग या गाण्यात व्यक्त होतेय. लाखो गरीब कामगारांच्या भावनाच लोकशाहीर व्यक्त करताहेत. गरीबांविषयी कणव असलेल्या साहित्य सम्राट लोकशाहीरांना आज जन्मदिनी विनम्र अभिवादन.

🌹⚜️🌹🔆🙏🔆🌹⚜️🌹

*_माझी मैना गावाकडं राहिली_*
*_माझ्या जिवाची होतिया काहिली_*

*_ओतीव बांधा रंग गव्हाला_*
*_कोर चंद्राची उदात्त गुणांची_*
*_मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची_*
*_हसून बोलायची मंद चालायची_*
*_सुगंध केतकी सतेज कांती_*
*_घडीव पुतली सोन्याची नव्या नवतीची_*
*_काडी दवन्याची रेखीव भुवया_*
*_कमान जणू इन्द्रधनुची हिरकणी हिरयाची काठी आंधल्याची_*
*_तशी ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण_*
*_माझा जिव की प्राण नसे सुखाला वाण_*
*_तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली_*
*_माझ्या जिवाची होतिया काहिली_*

*_गरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची_*
*_झाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची_*
*_वेळ होती ती भल्या पहाटेची बांधाबांध झाली भाकर तुकड्याची_*
*_घालवित निघाली मला माझी मैना चांदनी शुक्राची_*
*_गावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची_*
*_शिकस्त केलि मी तिला हसवण्याची_*
*_खैरात केली पत्रांची वचनांची_*
*_दागिन्यांन मडवुन काडयाची_*
*_बोली केली शिंदेशाही तोड्याची_*
*_साज कोल्हापुरी वज्रटिक गल्यात माळ पुतल्याची_*
*_कानात गोखरे पायात मासोल्या दंडात इला आणि नाकात नथ सर्जाची_*
*_परी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची_*
*_आणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली मी मुम्बैची_*
*_मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात_*
*_नाही हसली गालात हात उन्चावुनी उभी राहिली_*
*_माझ्या जिवाची होतिया काहिली_*

*_या मुम्बई गर्दी बेकरांची त्यात भर झाली माझी एकाची_*
*_मढ़ेवर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची_*
*_ही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,_*
*_हडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची बुटांच्या जोडीची_*
*_पुस्तकांच्या थडीची माडीवर माडी हिरव्या माडीची_*
*_पैदास इथे भलतीच चोरांची एतखाऊची शिर्जोरांची_*
*_हरामखोरांची भांडवलदाराची_*
*_पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची_*
*_पर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची_*
*_पाण्यान भरल खीस माझ वान माला एका छात्रिची_*
*_त्याच दरम्यान उठली चलवल संयुक्त महाराष्ट्राची_*
*_बेलगांव, कारवार, निपानी, गोव्यासह एकभाषिक राज्याची_*
*_चकाकली संगीन अन्यायाची फ़ौज उठली बिनिवारची_*
*_कामगारांची शेतकरीयांची मध्यमवर्गियांची_*
*_उठला मराठी देश आला मैदानी त्वेष_*
*_वैरी करण्या नामशेष गोळी डमडमची छातीवर सहिली_*
*_माझ्या जिवाची होतिया काहिली_*

*_म्हणे अन्नाभाऊ साठे घर बुडाली_*
*_गर्वाची मी-तू पणाची जुल्माची जबरिची_*
*_तस्कराची निकुम्बलीला कत्तल झाली इन्द्रजिताची_*
*_चौदा चौकड्याच राज्य गेले रावनाचे लंका जलाली त्याची_*
*_तीच गत झाली कलियुगामाजी मोरारजी देसायाची आणि स.का. पाटलाची_*
*_अखेर झाली ही मुम्बई महाराष्ट्राची_*
*_परलच्या प्रल्याची लालबागच्या लढायची फौंटनच्या चढ़ाइची_*
*_झाल फौंटनला जंग तिथे बांधुनी चंग_*
*_आला मर्दानी रंग धार रक्ताची मर्दानी वाहिली_*
*_माझ्या जिवाची होतिया काहिली_*

*_महाराष्ट्राने गुढी उभारली विजयाची_*
*_दाखविली रित पाठ भिंतीला लावून लढायची_*
*_पारी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची_*
*_गावाकडे मैना माझी भेट नाही तिची_*
*_तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची_*
*_बेलगांव, कारवार, डांग, उम्बरगावावर मालकी दुजांची_*
*_धोंड खंडनीची कमाल दंडलीची चिड बेकिची गरज एकीची_*
*_म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिराची_*
*_आता वलु नका रणी पलु नका कुणी चलू नका_*
*_बिनी मारायची अजुन राहिली_*
*_माझ्या जिवाची होतिया काहिली_*

🌹⚜️🌹🌼🌺🌼🌹⚜️🌹

*गीत : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* ✍️
*स्वर : आनंद शिंदे*
*मूळ गायक : शाहीर विठ्ठल उमप*

संकलन : वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.

मो.नं. ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh