मनाचे दार उघडावे आणि दुःख वेशीवर टांगावे. By-Nilesh Konde-Deshmukh
—————————————-
नैराश्यातून, तणावातून बाहेर पडण्यासाठी काय करावे?
——————————————-
सोप्या शब्दात सांगायचे तर
आपल्या भावना – दुःख, तणाव, एकटेपणा, भीती आत दाबून ठेवायच्या नाहीत. कुणाला तरी भड़ाभड़ा सांगून मोकळे व्हायचे. समवयस्क व्यक्ती असेल तर ती तुम्हाला समजून घेऊ शकेल. तसेच वयाने मोठी व्यक्ती असेल तर अनुभवाचे दोन शब्द सांगून समजूत घालेल.
नैराश्य या गोष्टीला वयाचे, लिंगाचे, आर्थिक स्थितीचे किंवा सामाजिक प्रतिष्ठेचे सोयरसुतक नाही. किंबहुना, प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी नैराश्यातून जावे लागते. नैराश्यात माणसाला अगदी लहान काम पण अवघड, अशक्यप्राय वाटू लागते, एरवी किरकोळ असणार्या गोष्टींचा पण प्रचंड तणाव येतो. ह्याला कारण म्हणजे आपल्या मनाची अवस्था अत्यंत कमकुवत झालेली असते. मग आपण ती गोष्ट न करण्याचे कारण शोधतो आणि स्वतः ची समजूत घालतो. नंतर असे वागायची सवय लागते आणि वर्षानुवर्षे नैराश्यात जातात.
यावर उपाय म्हणजे,
मनात असे नकारात्मक विचार यायला लागले की लगेचच त्याला आवरायचे, दोन शहाणपणाचे शब्द सांगायचे आणि अगदीच ऐकेना तर जबरदस्तीने सकारात्मक वागायला लावायचे. सवय लागली की आपोआप ताळ्यावर येईल.
हे सांगणे खूप सोपे आहे पण एकट्याने करणे खूप अवघड! तेव्हा कुणीतरी मित्र/जिवलग निवडा जो आपणास यामधे मदत करेल आणि कधी गाड़ी रुळावरून घसरू लागली की परत जागेवर आणेल.
प्रसंगी कठोर शब्दांचा मर्यादित वापर करणारा जोडीदार हा निव्वळ सहानुभूती देणार्या पेक्षा उत्तम राहील!
मनाचे दार उघडावे आणि दुःख वेशीवर टांगावे.
सकारात्मकतेच्या प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
———————————————
संकलन :- वारकरी मंच. मो.नं ९८९००१३५२०
———————————————–
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा