एकत्र कुटुंब ठेवण्याचे काही मंत्र. By- Nilesh Konde-Deshmukh

एकत्र कुटुंब असावं असे वाटत असेल तर नक्की वाचा !!🙏💐

बऱ्याच लोकांना वाटते आपले सुद्धा एकत्र कुटुंब असावं. पण आजच्या काळात बऱ्याच लोकांना ते काही कारणाने शक्य होत नाही. नोकरी, शिक्षण वगैरे वगैरे.

काहींचे एकमेकाशी पटत नाही. कांहींचे विचार पटत नाहीत. समजून घ्यायला आणि समजून सांगणारे घरात कोणी नसते. तरीही एकत्र कुटुंब पद्धती ही गरज आहे. एकत्र कुटुंब पद्धती हवी असेल तर त्यासाठी खालील काही मुद्दे , टिप्स सर्वांनी पाळल्या पाहिजेत.

🔱 घरात जो कोण कर्ता पुरुष / स्त्री असेल त्याने सर्वांना समजून घ्यायला हवे, समजून सांगायला हवे. पण असे करताना आपले विचार त्यांच्यावर लादूनये. छोट्या छोट्या गोष्टी वरून रागावू नये, कोणत्याही कारणाने चीड चीड करू नये त्यामुळे नाराजी निर्माण होते.

🔱 कोणाशीही दूजाभाव करू नये, आपली मुले, मुली घरातील इतर सदस्यांची मुळे मुली. अगदी लहान वस्तु असो किंवा मोठी. उदा. चॉकलेट पासून सोन्याच्या वस्तू पर्यंत कोणत्याही बाबतीत दूजाभाव करू नये.

🔱काही जरी करायचे असेल तर सर्वांशी बोलून विचार विनिमय करून निर्णय घ्यावा. ज्याला जे हवे असेल ते आणावे.

🔱कोणताही महत्वाचा निर्णय घेताना सर्वांशी बोलून विचार करून निर्णय घ्यावा… निर्णय घेऊन विचार विनिमय करू नये त्यात काही अर्थ नसतो.

🔱एकाच गोष्टीला अनेकांचा विरोध असेल तर त्यावर निवांत विचार करून तो निर्णय, विचार टाळावा. तो इतरांवर लादू नये.

🔱आज प्रत्येकाला काही करायची इच्छा असते छोट्या गोष्टीला विरोध करू नये. हे कशाला केले असे बोलू नये, किंवा त्यावरून टोचून बोलू नये.

🔱सर्वांनी मिळून मिसळून वागावं, गैरसमज निर्माण होतील असे काही करू नये, बोलू नये. एकमेकांना टोचून बोलू नये, घालून पाडून बोलू नये. टोमणे मारणे टाळावे.

🔱 विचारात मतभेद असले तरी मन भेद नसावे. गैरसमज निर्माण झाल्यास लवकर ते मिटवावेत.

🔱 बाहेरच्या व्यक्तीचे ऐकून गैरसमज करून घेऊ नये, तिचे बोलणे ऐकून सोडून द्यावे. त्यावरून घरात मतभेद होऊ नये.

🔱 त्याग…प्रत्येकाकडे त्यागाची भावना असावी. देण्याची भावना असावी, वाटून घेण्याची वृत्ती असावी. मलाच सर्व मिळावे ही वृत्ती नसावी.

🔱मी म्हणतो तेच योग्य, माझेच खरे असे होऊ नये. स्वतःचे विचार कोणावर लादू नये. टोमणे मारू नये.

🔱 प्रत्येकास काही वैयक्तीक खर्च असतो त्याची व्यवस्था करावी त्यासाठी त्या व्यक्तीला मागण्याची वेळ येऊ देऊ नये. ( लहान मुले सोडून )

🔱 प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण नसते, कामात काही कमी जास्त होत असते त्यावरून वाद होऊ नये.

🔱 घरात वैयक्तीक स्वार्थ असू नये… जे करायचे ते सर्वांसाठी करावे.

🔱 पै पाहुण्यात दूजाभाव करू नये. आलेल्या पाहुण्यांची उठ बस सर्वांनी मिळून करावी. हा माझा जवळचा पाहुणा नाही, माझ्या माहेरचा नाही तर मी का करू अशी वृत्ती नसावी. सर्व काम मिळून मिसळून करावे.

🔱 स्वावलंबन… प्रत्येकाने शक्य होईल तेवढे स्वावलंबी व्हावे. शक्य होतील तेवढी स्वतःची कामे स्वतः करावी. इतरांना सांगू नये.

🔱तसेच घरातील स्त्रियांना स्वयंपाक, धूनी भांडी, घराची स्वच्छता तसेच न दिसणारी अनेक कामे असतात तरी पुरुषांनी शक्य होईल तेवढ्या कामात वेळ मिळेल तेव्हा मदत करावी. प्रत्येकाने आपले घर स्वच्छ राहील याची काळजी घ्यावी. इतरांवर सोडू नये.

🔱 स्त्रियांनी ही एकमेकींशी बोलताना गैरसमज होणार नाही असे बोलावं. टोमणे मारत बोलू नये.

🔱 अशा प्रकारे जास्तीत जास्त एकमेकांना समजून घेऊन हसत खेळत घरातील वातावरण राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी. पण प्रत्येक गोष्टीत विनोद करू नये.

अशा प्रकारे घर चालवले तर एकत्र कुटुंब आनंदाने राहील यात शंका नाही.
आणि महत्वाचे एकमेकांवर प्रेम, जिव्हाळा आणि विस्वास असावा !!

संकलन : वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.

मो.नं. ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh