ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज एकत्र येणे ही काळाची गरज. By- Nilesh Konde-Deshmukh
नाब्रह्म क्षत्रमृध्नोति ना क्षत्रं ब्रह्म वर्धते ।
ब्रह्म क्षत्रं च सम्पृक्तम् इह चामुत्र वर्धते ॥
– मनुस्मृति, अध्याय ९, श्लोक ३२२
अर्थ : ब्राह्मतेजाविना क्षात्रतेज वाढू शकत नाही आणि क्षात्रतेजाविना ब्राह्मतेज वाढू शकत नाही. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आले, तर त्यांचा या लोकी, तसेच परलोकीही उत्कर्ष होतो. त्याचप्रमाणे ब्राह्मण आणि क्षत्रिय जर एकत्र आले, तर ते दोघे मिळून वनेच्या वने जाळणार्या अग्नीप्रमाणे शत्रूंना जाळून टाकतील.
महाभारतात असे सांगितलेे आहे की,
ब्रह्म क्षत्रेण संसृष्टं क्षत्रं च ब्रह्मणा सह ।
उदीर्णौ दहतः शत्रून् वनानीवाग्निमारुतौ ॥
– महाभारत, पर्व ३, अध्याय २७, श्लोक १०
अर्थ : वायू आणि अग्नी ज्याप्रमाणे एकत्र आल्यावर वनांनाही भस्म करून टाकतात, त्याप्रमाणे ब्राह्मण अन् क्षत्रिय एकत्र आले, तर शत्रूंना नष्ट करतील.
खरंतर आज चाललेल्या निती अनितीच्या लढाईत, अधर्म च्या या लढाईत ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज एकत्र नाही आले तर अधर्मी लोक आपल्या कृत्यांद्वारे जाती पतीचे राजकारण करतील आणि जर असं झालं तर राष्ट्र, धर्म आणि पर्यायाने सुसंस्कृत वारसेच पतन अटळ आहे म्हणून ब्राम्हतेज आणि क्षात्रतेज एकत्र येणे ही काळाची गरज आहे.
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो नं ९८९००१३५२०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा