वारकरी संप्रदायात तुळशीचे महत्त्व. By- Nilesh Konde-Deshmukh.



तुलसीविण ज्याचे घर। तें तंव जाणावें अघोर।
तेथ वसती यम किंकर। आज्ञा आहे म्हणोनि।।

तुलसीवृंदावन ज्याचे घरी । त्यासी प्रसन्न श्रीहरी।
तुलसीवृंदावना जे करिती प्रदक्षिणा। जन्ममरण त्यांना नाही नामा म्हणे।।

अर्थ -
 ज्या घरात तुळस नाही ते घर अघोर समजावे, तेथे यमदूतांचे वास्तव्य असते. परमेश्वराची आज्ञा म्हणून ज्या लोकांच्या घरात तुळशी वृंदावन आहे त्यांच्यावर श्रीहरी प्रसन्न होतात. जो व्यक्ती तुळशीवृंदावनाला प्रदक्षिणा घालून श्रीहरीचे स्मरण करतो तो जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो.

या सर्व गोष्टींमुळे वारकरी संप्रदायात तुळशीचे खास महत्त्व आहे.

-----------------------------------------------
सर्व वैष्णव संप्रदायात गळ्यात तुळशीमाळ का घालतात?
-----------------------------------------------

सर्व  वैष्णव संप्रदायात तुळशीच्या काष्ठमण्यांची माळ करून ती नेहमी गळ्यात धारण करतात. 
तुलसीमाला धारण करणाऱ्यास पदोपदी अश्वमेधाचे फल प्राप्त होते, असे ब्रह्मवैवर्तपुराणात  म्हटले आहे. 
पंढरीची वारी करणाऱ्या वारकरी स्त्रिया आपल्या डोक्यावरून पितळी तुलसीवृंदावन पंढरपुरास नेतात. निधनसमयी मृताच्या मुखात, कपाळावर व दोन्ही कानांवर तुलसीपत्र ठेवतात.

तुलसी उपनिषद नावाचे एक  उपनिषद आहे.
 त्यात तुळस ही जन्ममृत्यूचा नाश करणारी अमृतोद्‌भवा, विष्णुवल्लभा असून तिच्या दर्शनाने पापानाश व सेवनाने रोगनाश होतो, असे म्हटले आहे

वारकरी संप्रदायाला 'माळकरी संप्रदाय' असेही एक पर्यायी नाव आहे.

 प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या १०८ मण्यांची माळ असते. इतर अनेक धर्मपंथांत माळेला स्मरणी म्हणून महत्त्व आहेच; पण वारकरी संप्रदायात ही तुळशीच्या मण्यांची माळ घातल्याखेरीज कोणाला वारकरी होताच येत नाही. माळ घालणे, म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. 

आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होतात. वारकरी संप्रदायात पंढरपूराला आपले माहेर म्हटले जाते आणि विठ्ठ्ल-रुख्मिणीला आपले आई-वडील.
 वारकरी संप्रदायात आणखी एका गोष्टीला फार महत्त्व आहे ते म्हणजे तुळशीची माळ आणि तुळशी वृंदावन.

 जाणून घ्या, वारकरी संप्रदायात तुळशीचे महत्त्व.

तुळशीचे रोप सात्विकतेचे प्रतीक आहे. नियमित तुळशीच्या दर्शनाने सुख-समृद्धी प्राप्त होते. तुळशीचा स्पर्श प्रचंड ऊर्जा देतो. ज्या ठिकाणी तुळस असते तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते. तुळशीमुळे मन प्रसन्न आणि आनंदी राहते. 
तुळशीची माळ घातल्याशिवाय वारकरी होता येत नाही.

आयुष्यतील कर्तव्य कर्म करताना भगवंताचे विस्मरण होऊ नये म्हणून गळ्यात तुळशीची माळ धारण करणे आवश्यक आहे.

वारकरी दीक्षा घेताना गळ्यात घातलेली माळ काही कारणामुळे तुटल्यास ती पुन्हा गुंफून गळ्यात घालेपर्यंत वारकऱ्याला अन्न सेवन करता येत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh