घटस्थापना. By- Nilesh Konde-Deshmukh.
“घटस्थापना एक कृषकौत्सव”
गणनायिकांचा उत्सव,
मातृसंस्कृतीची ओळख,
सिंधूसंस्कृतीचे आद्य जोडपे शिव-पार्वती अन् तेव्हापासून चालत आलेली मातृसत्ताक पध्दतीची मानवतावादी परंपरा व त्याचाच एक भाग म्हणजे नवरात्रोत्सव सोहळा होय.
घटस्थापना याच दिवशी गणनायिकांनी म्हणजे स्त्रियांनी शेतीचा शोध लावला. याचाच प्रत्यय म्हणजे माती चौरंगावर ठेवून त्यावर धान्य टाकून त्यात कोणत पिक दहा दिवसात जोमाने येते हे तपासलं जायचं अन् त्याच धान्याची शेती केल्या जायची.
स्त्री गरोदर असतांना तिला असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की जर कुशीत बाळ जगू शकते, तर बी जमीनीत रुजवले तर त्यातुन झाड उगवू शकते. आदिमानवाचा मुख्य व्यवसाय शेती नव्हता तर शिकार करणे हा होता. तेव्हा स्त्रिया शिकारीला न जाता मुलं सांभाळत आणि फावल्या वेळात स्त्रिने शेतीचा शोध लावला, असे मानायला हरकत नाही.
शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावला म्हणूनच त्या स्त्रियांबदद्ल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा नवरात्रोत्सव असा असायचा पण सध्य स्थितीत मातृसत्ताक सोहळ्याला कर्मकांडाचे रूप मिळालेले दिसून येत आहे.
मातृसत्ताक संस्कतीची ओळख म्हणजे
सिंधू नदीच्या खोय्रात -“राणी निऋतीचे” राज्य,
यमुनेच्या खोय्रात- राणी उर्वशीचे,
नर्मदेच्या खोय्रात- राणी ताटकेचे,
गोदावरीच्या खोय्रात राणी शृपणखाचे,
भीमेच्या खोय्रात-राणी मावळाईचे,
पंचगंगेच्या खोय्रात-राणी अंबाबाईचे,
तेरणा-मांजरेच्या खोय्रात-राणी तुळजाईचे राज्य होते.
राणी निऋतीने प्रगत शेतीचा शोध लावला.
राणी मावळाईवरून “मावळा” हा शब्द आला.
तुला म्हणजे- मोजमाप करणे होय. आपल्या राज्यातील संपत्तीचे सर्वाना समान मोजमाप करणारी म्हणजेच-तुळजाई (राणी) गणनायिका होय.
स्त्री ही खरी स्रजनशील,कर्तत्ववान, हिम्मतवान व धैर्यवान आहे हे सांगणारा आनंदोत्सव म्हणजे “दुर्गा उत्सव”
दुर्गा ही राणी निऋतीची पराक्रमी कन्या होय.
हिंदू धर्मग्रंथात स्त्रिला अत्यंत आदराचे स्थान आहे. ऋग्वेदात चारशेच्या वर ऋचा महिलांनी लिहलेल्या आहेत.
गार्गी, लोपमुद्रा, सरस्वती या विदुषी स्त्रीयांचा उल्लेख ऋग्वेदात येतो.
एवढेच काय तर मरीमाय, मातामाय, दंतेश्वरी, बमलेश्वरी, चवडेश्वरी अशा देवी त्या त्या प्रांतातला माणूस पुजत असतो.
असो आपणास नवरात्र उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा.
मंग चला तर आपण आपले सण-उत्सव आनंदाने साजरे करूयात.
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.
मो.नं.९८९००१३५२०
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा