निष्ठेचा एक...नाथ. By- Nilesh Konde-Deshmukh.

आता काल परवाची गोष्ट. गोष्ट तशी राजकीय परंतु सामाजिक काम करत असताना गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गेली 39 वर्षं सातत्यानं एका पक्षाबरोबर निष्ठावंत राहून आपला आयुष्य वेचणाऱ्या एकनाथ खडसे या व्यक्तिमत्त्वातून निष्ठावंत रेखाटण्याचा केलेला लिखाणाचा हा खटाटोप.
सध्या राजकारण एवढ्या खालच्या पातळीला गेलेलं आहे की माणूस आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपली सत्ता टिकवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. हिंदीमध्ये असं म्हटलं जातं की रियासत की बुनियाद हिलने लग जाये तो खून की जरूरत पड़ती है । परंतु या प्रकरणांमध्येे खून म्हणजे थोडक्यात राजकीय बळी असं समजावं. 39 वर्षांच्याा प्रदीर्घ काळानंतर एकनाथराव खडसे यांनी घड्याळ हातावर बांधल आणि खऱ्या अर्थानंं निष्ठेचा कुठेतरी अस्त झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 
39 वर्षांमध्ये खडसेंना विविध पदही मिळाली मानसन्मान ही मिळाला परंतु जेवढा मानसन्मान मिळाला तेवढा अपमान ही मिळाला आणि दोन्ही बाजू या समांतर झाल्या. 
देण घेण हा व्यवहार झाला आणि काही न घेता फक्त देण म्हणजे समर्पित करण म्हणजे निष्ठा. पण ती दोन्ही बाजूंनी सारखीच असली पाहिजे आणि ती देखील निस्वार्थी. 
शिवरायांच्या काळात महाराजांसाठी मावळे मरायला तयार होते कारण हिरोजी इंदुलकरां पासून शिवाजी काशिद पर्यंत सर्वांच्या कुटुंबाचा मुलाबाळांचा विचार करणारा, तजविज करणारा राजा त्यांच्यासोबत होता आपल्या निष्ठेला न्याय मिळणार ही भावना मावळ्यांची होती म्हणूनच इतिहासामध्ये पहिल्यांदाच मरणारी फौज तयार झाली.
परंतु सध्याच्या काळामध्ये राजकारण बदलत चाललंय असं चित्र पाहायला मिळत आहे. खरं तर या ठिकाणी एकनाथ खडसे यांना न्याय मिळणे गरजेचं होतं परंतु राजकीय द्वेषापोटी त्यांचा बळी देण्यात आला हे मात्र अंतिम सत्य परंतु यातून एकनाथ खडसे यांचा बळी न जाता निष्ठेचा बळी गेला हे मात्र तितकेच खरे.
आता यामध्ये एकनाथ खडसेंवर निष्ठा असलेली निष्ठावान किती आणि पक्षावर निष्ठा असलेले निष्ठावंत किती ही चढावोढ होऊ शकते. आगामी काळामध्ये हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरेल. परंतु हे होत असताना राजकारण करत असताना निष्ठेचा एकनाथ होऊ नये हीच भावना महत्त्वाची.
सर ते शेवटी नामदेव ढसाळ एका कवितेमध्ये आपल्या भावना व्यक्त करताना म्हणतात,
(मूळ कवितेमध्ये थोडासा बदल केलेला आहे)
निष्ठावानांच्या वरील अन्यायाची मालिका येथे खंडित होत नाही,
स्वतंत्र नावाचे रंडी येथे नांदत नाही,
मुकी बहिरी झाली येथील वांझ व्यवस्था,
कार्यकर्त्यांच्या भावना यांना कधी समजत नाही,
निष्ठेचे बुरुंज आता ढासळू लागले,
बडव्यांचे मनोरे उंच उंच चढु लागले,
आधारस्तंभ नावाचे बुरखे कधीच फाटलेत,
लालसा पाई माणसं इथं बाटलेत,
गर्व निष्ठावान असल्याचा कसा आम्ही करावा,
स्वार्थ नावाचा राक्षस कुठे नेऊन पुरावा.
खडसेंच्या निष्ठेला राष्ट्रवादी मध्ये न्याय मिळावा आणि पुन्हा कोणा निष्ठेचा एक...नाथ होवु नये ही माफक अपेक्षा.


©®✍ श्री निलेश कोंडे-देशमुख.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh