नऊ संख्या आणि नवरात्र By- Nilesh Konde-Deshmukh

नऊ संख्या आणि नवरात्र अध्यात्मिक संबंध आणि महत्त्व.

🌺 नवरात्रीच्या घटाभोवती पसरलेल्या मातीत पेरली जाणारी ‘नऊ’ धान्यं
साळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, हरभरा, जवस, मटकी.

🔶 दुर्गामातेचे ‘नऊ’ अवतार
शैलपुत्री, ब्रह्यचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायिनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिरात्री.

🔶 दुर्गादेवीची ‘नऊ’ नावं
अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, नारायणी, रेणुका.

🌺 महाराष्ट्रातली देवीमातेची प्रसिद्ध ‘नऊ’ देवस्थानं
वज्रेश्वरी (वसई), महालक्ष्मी (डहाणू), महाकाली (अडिवरे), सप्तशृंगी (वणी), रेणुकादेवी (माहूर), महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), योगिनीमाता (अंबेजोगाई), 
श्री एकवीरादेवी (कार्ला).

🌺 नवरात्रींचे ‘नऊ’ रंग
लाल, निळा, पिवळा, हिरवा, राखाडी, भगवा किंवा केशरी, पांढरा, गुलाबी, जांभळा.

🌺 नवग्रहांच्या ‘नऊ’ समिधा
रुई, पलाश, खदिर, अपामार्ग, पिंपळ, औदुंबर, शमी, दुर्वा, कुश.

🌺 नवग्रहांची ‘नऊ’ रत्नं
माणिक, मोती, प्रवाळ, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलमणी, गोमेद, वैडूर्य,पीतवर्ण-मणी.

🌺 ‘नऊ’ प्रकारची दानं
अन्नदान, धनदान, भूदान, ज्ञानदान, अवयवदान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, देहदान.

🔶 नवविध भक्तीचे ‘नऊ’ प्रकार
श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन, पादसेवन, वंदन, सख्य, दास्य, आत्मनिवेदन.

🌺 प्रसिद्ध ‘नऊ’ नाग
शेष, वासुकी, तक्षक, शंखपाल, कालिया, कर्कोटक, पद्मक, अनंत, पद्मनाभ.

🔶 समस्त मानवजातीला सामावून घेणा-या पृथ्वीचे नवखंड
भरतखंड (पूर्व), केतुमालखंड (पश्चिम), रम्यखंड (दक्षिण), विधिमालखंड (उत्तर), वृत्तखंड (आग्नेय), द्रव्यमालखंड (नैऋत्य), हरिखंड (वायव्य), हर्णखंड (ईशान्य), सुवर्णखंड (मध्य).

🌺 मानवी देहांतर्गत असलेले ‘नऊ’ कोश
 अन्नमय, शब्दमय, प्राणमय , आनंदमय, मनोमय, प्रकाशमय, ज्ञानमय , आकाशमय, विज्ञानमय.

🌺 मानवी मनाचे ‘नऊ’ गुणधर्म
 धैर्य, सामर्थ्य, भ्रांती, कल्पना, वैराग्यवादी, सद्विचार, रागद्वेषादी असद्विचार, क्षमा, स्मरण, चांचल्य.

🌺 मानवी शरीराच्या ‘नऊ’ अवस्था
मातेच्या उदरातली निषेक रूपावस्था, गर्भावस्था, जन्म, बाल्य, कौमार्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व, मृत्यू.

🌺 नाथांच्या नीतीशास्त्रातली ‘नऊ’ रहस्यं
आयुष्य, वित्त, गृहछिद्र, मैथून, मंत्र, औषध, दान, मान, अपमान.

अंक शास्त्रातील महत्त्वपूर्ण असलेली संख्या, ९+९ किंवा ९x९ कसंही केले तरी एक अंकी संख्या ९ वच येते. परीपुर्ण संख्या येणाऱ्या नवरात्री मध्ये ९ या संकेत प्रभुत्व असणार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh