आनंदाचे रहस्य. By-Nilesh Konde-Deshmukh
----------------------------------------
जीवनात आनंदी कसे रहावे?
-----------------------------------------
तसं म्हणायचं तर आनंदी राहणं खूप सोप्पे आहे . आपली लोकं मुद्दाम त्याला अवघड बनवतात. तुम्हाला काही उपाय सांगतो ज्याने तुम्हाला आनंदी राहता येईल .
१) लोकांवर अपेक्षा ठेवणे सोडून द्या किंवा कमीत कमी ठेवा . कारण जर तुमच्या अपेक्षा ते भरू शकले नाहीत तर तुमच्या नात्यांमध्ये कडूपणा येऊ शकतो . म्हणून मोठ्या अपेक्षा ठेवणे टाळा.
२) लहान लहान गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करा . ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे . एक लहान आनंदी गोष्ट तुमच्या दिवसाला छान बनवण्यासाठी उपयुक्त असते .
३) व्यायाम आणि ध्यान धारणा . मला माहितेय काही लोकांना प्रश्न पडेल की यांनी आनंद कसा मिळेल ? तर हो , नक्की मिळेल . व्यायाम केल्याने तुमचे शरीर सुडौल बनते , बहारदार बनवते आणि तुमचा कामामध्ये अधिक लक्ष लागते . ध्यान धारणा करून तुम्हाला आत्मिक सुख व शांती लाभेल .
४) भुख लागेल तेंव्हा जेवण आणि पोटभर जेवण आनंदी ठेवते.
५) अती विचार करणे हे टाळायला शिका . तुम्ही जेवढा अधिक विचार करतात , तेवढा जास्त तुमच्या डोक्याचं खोळंबा होतो . म्हणून जास्त विचार करून कुणालाच त्रास होत नाही आणि तुमच्या मानसिक शरीराला नुकसान होते .
६) जीवनात सफलता , असफलता , प्रेम , मैत्री हे सर्व अनुभव आहेत . जर मिळाली तर चांगलीच आहे , आणि जर नाही मिळाली तर वाईट अनुभव म्हणून सोडून द्यायला शिका . जीवनात अनेक संधी मिळत राहतात . फक्त त्यांना पकडण्याची गरज असते .
७) खरं बोलायला शिका. मला माहितीये हे अतिशय अवघड गोष्ट आहे , पण जर तुम्ही खरे राहिलात , तर ते फार उपयोगी पडेल . तुम्ही जर खोटे बोललात , तर त्याला लपवायला अजून शंभर खोटे बोलतात आणि तुम्ही यात विजयी सुद्धा होताल , त्यात वाद नाही . पण तुमच्या मनाला नेहमी ती खंत राहील आणि तुम्ही उदास होताल .
८) दिवसातून काही वेळ आपल्या आवडीचा छंद करण्यात घालवा. किमान अर्धा एक तास तरी. मग ते गाणी ऐकणे असु देत , नाचणे असुदे , किंवा पाक कला शिकणे असुदे . तुम्हाला बरे वाटेल केल्यावर.
९) जीवनात एक तरी असा माणूस असायला हवा ज्याला तुम्ही सर्व निःसंकोचपणे सर्व काही बोलू शकता . मग तो मित्र असो , मामा असो , मौशी असेल किंवा कोणी ही असेल . तुमचा डोकं हल्क होणे खूप गरजेचे असते .
१०) घरच्यांचा आणि मित्रांचा सहवास हा आपल्याला आनंदी ठेवतो . त्यांना योग्य वेळ द्या .
अशाप्रकारे या गोष्टी तुम्हाला नक्कीच आनंदी राहायला मदत करतील.
-----------------------------------------------
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520
-------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा