ज्ञानेश्वर महाराज अभंग. By-Nilesh Konde-Deshmukh
https://www.facebook.com/nileshkondedeshmuk/
मो.नं. ९८९००१३५२०
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
कर्पूर अग्नीसी स्वदेहा नाशी ।
चंदनी मासी न थरे देखा ॥१॥
घ्राणाची कळिका भ्रमर रूंजीका ।
तेथील झुळुका रूंजी करी ॥२॥
मोतियाचा चारा राजहंसा सैरा ।
दुजिया पाखिरा कामा नये ॥३॥
ज्ञानदेव म्हणे घेती ते शाहाणे ।
येर ते पाहुणे यमाचे रया ॥४
🔱🔱🔱🔱🔱🔱🔱🔱
🚩भावपराग🚩
🔱कापूर सुगंधी असतो पण त्याचा अग्निसी संबंध पावला तर नाश होतो.चंदन सुगंधी असतो व तोच अग्निसी संबंध पावला तर त्याच्यावर मांसी बसत नाही.
🔱कमलनी भ्रमरूला आपल्या सुगंधाने गुंजारवीत असते व त्या सुगंधाच्या झुळकेने तो फुलांभोवती गुंजारव करत असतो.परंतु नाक हेच जर फूल झाले तर त्यांत येणाऱ्या सुगंधाच्या झुळकेस रंजणारे म्हणजे सुख पावणारे घ्राणेंद्रिय हेच आहे.
🔱मोत्यांच्या चाऱ्यांची गोडी एका राजहंसालाच कळते दुसऱ्याला ती चव कळणार नाही.
🔱मनुष्य देहांत आत्मरूपाने ब्रह्मवास करीत आहे.त्या ब्रह्मस्वरूपाला जो जाणेल तोच खरा शहाणा.त्याला जो जाणणार नाही असा मूर्ख मनुष्य जन्म मृत्युच्या फेऱ्यात पडतो. म्हणून परमात्मस्वरूपाला यथार्थ ओळखणे हेच मनुष्यांचे आद्य कर्तव्य आहे,असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
▬ஜ۩۞۩ஜ▬
॥राम कृष्ण हरि॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा