' हिंदू ' शब्द किती जुना? By-Nilesh Konde-Deshmukh.

' हिंदू ' शब्द किती जुना?  By-Nilesh Konde-Deshmukh.



                             सोशल  मिडीयावरील  एका पोस्टम्ध्ये  असे म्हटले होते की, ' हिंदू ' हा शब्द  मुसलमानांनी प्रचलित केला.त्यासाठी जो संदर्भ दिला  होता  त्याबाबत योग्य तो खुलासा नंतर करतो.सर्वसाधारणपणे  ' हिंदू ' शब्द  ' सिंधू ' ह्या शब्दाचा अपभ्रंश आहे ही गोष्ट सर्वांना ठाऊक आहे.
 पण हिंदू ' हा शब्द कसा प्रचलित झाला  आणि ऐतिहासिक दृष्ट्या तो किती प्राचिन आहे याचा  उपलब्ध साधन सामुग्रीचे आधारे  धांडोळा घेतला तर  असे दिसून येते की तो श्ब्द पर्शियन लोकांनी  प्रथम वापरला आणि प्रचलित  केला.पर्शियन लोकांना' स' उच्चार करता येत नव्हता त्यामुळे  त्यांनी
 सिंधू ' ऐवजी  ' हिंदू ' असे चूकीचे उच्चारण केले.प्राचिन पर्शियन Cuneiform Inscription आणि  त्यांचा धर्मग्रंथ  ' Zend Avesta ' ह्यात हिंदू शब्दाचा उल्लेख  आहे.त्यात आलेला  ' हिंदू ' हा शब्द  धर्म ह्या संदर्भात नसून तो तत्कालिन भारत उपखंडाचे जे भौगोलिक  स्थान  होते त्या अर्थाने  आलेला  आहे.
                            Darious- I ह्या पर्शियन राजाने ख्रिस्त पूर्व ५१७ मध्ये  त्याच्या साम्राज्याचा विस्तार भारत उपखंडाच्या  सीमे  पर्यंत केला.त्याकाळी राष्ट्राच्या सीमा आता सारख्या कडक नव्हत्या  त्यामुळे काही भारतीय  लोकांच्या  वास्तव्याचा भूप्रदेश त्या साम्राज्यात  मोडत होता. तेथल्या भारतीय  लोकांचा  उल्लेख पर्शियन लोक ' हिंदू' असा चूकीचा  करीत कारण  त्यांना  सिंधू असा उच्चार  करता येत नव्हता हे वर नमूद केलेच आहे.
                            ऋग्वेदात  भारत  देशाचा  उल्लेख  ' सप्त सिंधू ' म्हणजे सात पवित्र नद्यांचा देश  असा केलेला  आहे.पुन्हा ' स ' चा उच्चार करता येत नाही म्हणून त्याचा अपभ्रंश  Hapta Hindu असा होऊन पुढे केवळ ' हिंदू ' असा झाला.ह्यावरून हि्दू शब्दाचे  मूळ पर्शियन भाषेत आहे.आणि मुसलमान धर्माची स्थापना त्यानंतर हजार एक वर्षाने झाल्यामुळे मुसलमानांनी  ' हिंदू ' शब्द प्रचलित केला हे सिद्ध होत नाही.
                            एका विद्वान गृहस्थाने असे मत मांडले की, अल् बिरूनी  ( इ.स. ९७३- १०४८)  ह्या मुसलमान पंडिताने ' हिंदू ' हा शब्द  प्रथम वापरला.पण ते खरे नाही.हा, बिरूनी पंडित होता यात शंकाच नाही कारण त्याने पतंजलींच्या योगसूत्राचे अध्ययन करून ' किताब पतंजल  ' ह्या  नांवाचे  पुस्तक अरेबिक भाषेत अनुवादीत केले होते.भारतीय / वैदिक संस्कृतीचा त्याचा अभ्यास होता आणि म्हणून त्याने आपल्या संस्कृतीवर ' किताब-अल्- हिंद ' नांवाचे पुस्तक लिहिले होते  कारण तत्कालिन मुसलमान लोकांना  ज्ञानाची उत्कंठा होती, जिज्ञासा होती आणि म्हणूनच  ह्या बरोबर भारताचे  खगोलशास्त्राचे  , गणिताचे ज्ञान अरबस्तानात  गेले.  आपली दशमान पध्दतीसुद्धा त्यांनी घेतली आणि तिकडूनच ती युरोपात गेली. ( संदर्भ:  In Search of the cradle of civilization , Written by : Georg Feuerstein ,  Subhash  Kak and David Frawley ) ह्यावरून त्या अल् बिरूनी नांवाच्या पंडिताच्या अनुवादित पुस्तकात  ' हिंद ' शब्द हा आहे म्हणून मुसलमानांनी ' हिंदू ' शब्द प्रथम  वापरला  हे सिद्ध  होत नाही. 

संकलन: nil.konde26@gmail.com
Mob.No.9890013520

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh