तुकोबांनी देव म्हणजे काय हे सांगितले आहे. By-Nilesh Konde-Deshmukh.

तुकोबांनी देव म्हणजे काय हे सांगितले आहे. By-Nilesh Konde-Deshmukh.


तुकोबा म्हणतात,

देव आहे देव आहे । जवळी आह्मां अंतरबाहे ।।

यात तुकोबांनी देव आहे असा स्पष्ट निर्वाळा दिला होता आणि तो कुठे आहे या विषयी काही संदेहही उरू दिला नव्हता. त्यांनी त्या दिवशी विवरूनही सांगितले होते की – देव आम्हां जवळी आहे! अंतरबाहे जवळी आहे!
देव अंतरी आहे, देव बाहेरही आहे. अंतरात आहे तो देव आहे, बाहेर आहे तो ही देव आहे. 

गोडीपणे जैसा गुळ । तैसा देव झाला सकळ ।।
आता भजो कवणे परी । देव सबाह्य अंतरी ।।
उदका वेगळा । नव्हे तरंग निराळा ।।
हेम अळंकारा नामी । तुका ह्मणे तैसे आम्ही ।।

यात तुकोबांनी प्रतिमा वापरून विषय अजून सोपा केलाय. गुळ आणि गोडी, पाणी आणि त्यावरील तरंग, सोन्याचे अलंकार आणि सोने ह्यांत वेगळे काही काढता येईल का असे विचारून ते म्हणतात तसाच देव सबाह्य अंतरी म्हणजेच सर्वत्र आहे. तो वेगळा काढून दाखविता येणार नाही.”
तुकोबा म्हणतात सोन्याचा जसा छानसा अलंकार होतो तसे त्या जीवाचे म्हणजेच देवाचे आपण बनलेले आहोत. आपल्यापासून देव वेगळा काढता येणारच नाही. इतकेच नव्हे तर पाहा, ते ह्या अभंगात म्हणतात, जेव्हा माझा जीव, मी आणि देव हे एकच आहो तेव्हा मी भजू तरी कोणाला?

देव सबाह्य अंतरी । आता भजू कवणे परि?”

रवि रश्मिकळा । न यें काढिता निराळा ।।
तैसा आह्मां झाला भाव । अंगी जडोनी ठेला देव ।।
गोडी साकरेपासूनी । कैसी निवडती दोनी ।।
तुका म्हणे नाद उठी । विरोनी जाय नभा पोटी ।।

एखादा नाद होतो तो कसा? तर ही हवा असते ना, तिचाच नाद होतो आणि त्याच हवेत नंतर तो विरूनही जातो. पाहावं तिकडे हे आकाश कसं पसरलेलं आहे? त्यात हवेचे नाद होत असतात आणि विरतही असतात. 

तसे देवाचे आहे. तो तसाच सर्वत्र भरलेला आहे. सबाह्य अंतरी तोच आहे. आपल्यात तोच आहे आणि दुसऱ्यातही तोच आहे.

nil.konde26@gmail.com
Mob.No.9890013520

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh