कर भला तो हो भला. By-Nilesh Konde-Deshmukh
©®✍ कर भला तो हो भला. By-Nilesh Konde-Deshmukh
आपल्या घरात कुणीतरी पुण्यवान व्यक्ती असतो. तो पर्यंत आपल्या घरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही....!!
जो पर्यंत बिभीषण लंके मध्ये राहत होते तो पर्यंत रावणाने पाप केले पण बिभीषणचे पुण्य कारणास्तव रावन सुखी होता....!!
परंतु जेव्हा बिभीषण सारख्या भगवंत वत्सल भक्ताला लाथ मारली व लंके मधून निघून जाणेस सांगितले.. तेव्हापासून रावणाची विनाश होण्यास सुरूवात झाली आणि शेवटी रावणाची लंका जळून दहन झाली व रावण मेल्यावर मागे रडायला कुणीही वाचले नाही....!!
असेच या प्रकारे हस्तिनापूर मध्ये जो पर्यंत विदूर सारखे भक्त राहत होते तो पर्यंत कौरवांना सुखच सुख मिळाले.. पण जेव्हा कौरवांनी विदूरचा अपमान करून राजसभेतून जाण्यास सांगितले तेव्हा श्रीकृष्णाने विदुरला सांगितले की काका आपण तिर्थ यात्रेला जावे, जसे विदुरने हस्तिनापूर सोडले,कौरवांचे पतन व्हायला सुरुवात झाली व शेवटी राज्य पण गेल व ककौरवांचे मागे कोणीही वारस राहिले नाही....!!
याप्रकारे आपल्या परीवारात जो पर्यंत कोणी भक्त किंवा पुन्यवान आत्मा राहतो. तो पर्यंत आपल्या घरात आनंदी आनंद राहतो.. यासाठी भगवंताच्या भक्तांचा अपमान कधीही करू नका. आणि आपण जे कमऊन खातो ते माहित नाही कुणाच्या पुण्याईने मिळत असते. यासाठी नेहमी आनंदी रहा व आपल्या परीवारात कोणी भक्त भक्ती करत असेल तर त्याचा अपमान करू नका तर सन्मान करा. व त्यांच्या मार्गदर्शना प्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. माहित नाही संसाराची गाडी कुणाच्या पुण्याईने चालते....!!
आई-वडिल, वयोवृद्ध व अतिथींचा नेहमी सन्मान करा. व सदगुरूनी दाखवलेल्या प्रमाणे जिवन जगा. व देवाची भक्ती करत रहा....!!
कर्मानुसार आले तर बरे झाले, गेले तर बला टळली सोबत काही घेऊन आलो नाही. जातांना या संसारातून काही घेऊन जायचे नाही.
शेवटी काय तर "कर भला तो हो भला।"
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा