मृत्यूची नोटीस नसते. By-Nilesh Konde-Deshmukh
किती करशील भरवसा या सुंदर नरदेहाचा।
अजून तुला कळला नाही फटका या यमाचा।
मृत्यूची नोटीस नसते, समन्स नसते तर डायरेक्ट पकड वाॅरंट असते.
कोणत्याही वयामध्ये ते येऊ शकते.मृत्यू राजा,रंक, लहान,थोर स्त्री,पुरूष काहीही पहात नाही.
यमदूत वाॅरंट घेऊन येतात तेंव्हा दुस-या कोणाला ते सही करून घेता येत नाही किंवा तो माणूस घरात नाही असे सांगताही येत नाही.
कारण वाॅरंट रिसीव्ह करणे हा प्रश्नच नसतो तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात (फास आवळला जातो) यमस्य करूणा नास्ती:भूकेलेल्याला ताटावरून,तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून,शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून,शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते.
मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही.
मग आपल्याला नेतात कुठे? हा विचार करणारे फार थोडे. (लंडन,अमेरिकेला जाताना पौंड्स,डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते,)
पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात "पुण्य करन्सी" महत्वाची असते ती जिवंतपणीच जमा करायची असते.
ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही.आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते.
99 व्या वर्षी 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो. दागदागिने आणि कॅश लाॅकर मध्येच रहाते, गुरे गोठ्यात रहातात. बरोबर काहीच नेता येत नाही
तरी जीव नश्वराच्याच मागे लागतो. अजगर बेडकाला गिळतअसतो आणि बेडुक माशा पकडण्यात रंगून जातो.
सहस्त्रचंद्रदर्शन झालेले राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात आणि कलावंत करोडो रुपये कमवूनही दहा मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात.भक्ती बर्वे,पद्मा चव्हाण,मॅरिलीन मनरो,जयश्री गडकर,गणेश भालेराव यांची काय जाण्याची वये होती का? पण यमाग्रजाने वाॅरंटच काढले होते.
बरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात.
या व्यस्त कलावंताना कुठे वेळ होता पुण्यसंचयासाठी? म्हणून श्रीगुरूचरित्रात महाराज सांगतात की वय तरूण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरवसा नाही.ते मातुःश्रींना म्हणाले,
"आई तू मला सांगतेस की अग्राह्य संन्यास बालपणी, वानप्रस्थानानंतर संन्यास घ्यावा
पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का?
" मातुःश्री निरुत्तर झाल्या.
प्रपंचाबरोबरच आध्यात्मही जवळ केले म्हणजे ज्ञान व सुरक्षितता लाभते!
"नाही भरवसा या घडीचा रे अभिमान धरीसी कोणाचा"
यासाठी भंगवताला प्रेम , भक्ती द्या. मग तो तुमच्या आवडीचा देव,संत चालेल पण एकच संत,गुरु,देव पाहिजे: अनेक नको; तुमची श्रद्धा, भाव त्यावर पाहिजे.मग बघा चमत्कार होतो कि नाही.
"हरि नामाच्या बँकेमध्ये रामनाम धन करा जमा।
ही हरीनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा"
राम कृष्ण हरी
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा