श्री ज्ञानेश्वरी. By-Nilesh Konde-Deshmukh
मो.नं.९८९००१३५२०
॥ श्रीज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। संन्यासयोगः ।
अर्जुन उवाचः संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥ १ ॥
भावार्थ :- अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा , कर्माचा त्याग करावा असे तू सांगतोस आणि पुनः कर्माचे अनुष्ठान करावे असेंहि तूच सांगतोस. या दोन्हीपैकी ( तुझ्या मताने) जे खरोखर श्रेयस्कर असेल ते एक मला निश्चित सांग.
मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचे बोलणें ।
एक होय तरी अंतःकरणे । विचारूं ये ॥ १ ॥
मग अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला, "अहो ! हे असे कसे तुमचे बोलणे ? तुम्ही एकच मार्ग सांगाल , तर त्यासंबंधी मनाने कांही विचार करता येईल...
मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु ।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥ २ ॥
यापूर्वी तुम्ही कर्माचा त्याग करावा , हे विविध प्रकारे सांगितले होते; परंतु आता कर्मयोग आचरणासाठी अधिक उत्तेजन का देता ?
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता ।
आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे ॥ ३ ॥
हे श्रीअनंता ! आपले असे दोन्ही मार्गाचे बोलणे ऐकून आम्हा अज्ञानी लोंकांच्या मनाला काही उलगडा होत नाही..
एकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति ॥ ४ ॥
ऐका. एका (सारभूत) तत्वाचा बोध करायचा असेल, तर ते एकच निश्चितपणे सांगितले पाहिजे. हे तुम्हाला दुसऱ्याने दुसऱ्यांनी सांगावयास पाहिजे काय ??
तरी याचिलागीं तुमतें । म्यां राऊळासी विनविले होते ।
जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा ॥ ५ ॥
याकरताच आपल्यासारख्या श्रेष्ठयानां मी विनंती केली होती की, परमार्थ हा गूढ अर्थाने सांगू नका ..
परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।
सांगे दोहींमाजि बरवा । मार्गु कवण ॥ ६ ॥
पण देवा ! मागील गोष्ट राहू दे. आता प्रस्तुत दोन्ही मार्गांपैकी कोणता मार्ग चांगला आहे, हे स्पष्ट करून सांगावे..
जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा ।
आणि अनुष्ठिता प्रांजळा । सावियाचि ॥ ७ ॥
जो मार्ग परिणामी अमृतमधुर आहे, ज्याचे फळ अचूक प्राप्त होते आणि जो आचरण करण्यास सहजच सरळ आहे,
जैसें निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोकासनां सांगडे । सोहपें होय ॥ ८ ॥
निद्रेचे सुख मध्येच भंग न पावता रस्ता तर पार करता आला पाहिजे, अशा सुखकारक वाहनासारखा जो सोयीचा असेल, तो मार्ग मला सांगावा..
येणें अर्जुनाचेनि बोले । देवो मनीं रिझले ।
मग होईल ऐकें म्हणितले । संतोषोनियां ॥ ९ ॥
असे अर्जुनाचे बोलणे ऐकून देवाच्या मनात प्रसन्नता तरारली आणि परम संतोषाने ते अर्जुनास म्हणाले , तू म्हणतोस त्याप्रमाणे होईल...
देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये ।
तो चंद्रुहि परी लाहे खेळावया ॥ १० ॥
श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात , पाहा, ज्या दैववानाला (सुदैवाने ज्याला) कामधेनुसारखी आई लाभली आहे, त्याला आकाशातील चंद्रदेखील खेळायला मिळतो.
卐 "वसुदेव सुतं देवं कंस चाणुर मर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगदगुरूम" 卐
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520
राम कृष्ण हरी 🚩🚩
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा