नामस्मरणाचे प्रकार. By- Nilesh Konde-Deshmukh
नामस्मरणाचे ११ प्रकार -
१. नामाचा उच्चार करणे व तो आपल्या कानांनी ऐकणे.
२. नामाचा उच्चार करणे व तो करताना उपासनामूर्ती चरणापासून मस्तकापर्यंत पुन्हा पुन्हा पहात राहणे.
३. भगवंत व भगवन्नाम दोन्ही एकच आहेत या बोधात नामस्मरण करणे.
४. टाहो फोडून नामाचा उच्चार करणे- प्रभू कोठेतरी दूर आहे या भावनेने जप करणे.
५. श्वासोश्वासासी नामस्मरण - श्वास आत घेताना राम म्हणणे. दुसरा उच्छवास बाहेर सोडित असताना व तिसरा पुन्हा श्वास घेताना राम म्हणणे.
६. श्वासावर लक्ष देवून नामस्मरण करणे- या प्रकारात नाम घेत रहाणे व श्वासावर फ़क्त लक्ष ठेवणे.
७. स्वरूपाच्या स्मरणात नामाचा उच्चार - देह म्हणजे मंदिर व या मंदिरातील देवाला तळमळीने हाक मारणे.
८.जीव्हेला वेग देवून नामस्मरण करणे- भटकणारया मनाला लगाम घालून त्याला स्थिर करण्याचे सामर्थ्य या नामस्मरणात आहे.
९. भूती भगवंत या भावात नामस्मरण- भगवंत सर्वत्र भरुन राहिलेला आहे. या भावात नामस्मरण करणे.
१०. सद्गुरुंची मूर्ती मन:चक्षुसमोर ठेवून नामस्मरण- या प्रकारच्या नामस्मरणात साधकाची प्रगती त्वरित होते.
११. संख्या ठरवून माळेवर जप करणे- हा प्रकार दिसावयास सोपा पण अनुभवाच्या दृष्टीने फार श्रेष्ठ आहे.
nil.konde26@gmail.com
Whatsapp 9890013520

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा