चला माणूस बनू या.By- Nilesh Konde-Deshmukh.

स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते.




 ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....

      हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..

जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव  लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.

जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घाटावर, अलिशान बंगल्यामध्ये छानसा सुंदर तयार केलेला बाथरूम, तरीही शेवटची आंघोळ ही त्यात नव्हती, तर ती होती फक्त आणि फक्त घरा समोरील रस्त्यावर आयुष्यभर ज्या साठी झगडला, त्यातील एक गोष्ट सुध्दा बरोबर नव्हती.

जळताना - ना प्रेम करणारे जिवलग, ना नातेवाईक, ना सगे सोयरे, ना करोडोची संपत्ती. 

अरे अरे.... 
तरीही तो आयुष्यभर खोट्या गोष्टीचा मोह धरून पळत राहिला....  
ही खंत तर नसेल वाटत त्या जळणा-या प्रेताला...?

     बंधुंनो....!
आत्मप्रौढी, स्वतःचा मोठेपणा, दुस-याबाबत आकस, समोरच्याला कमी लेखण्याची हीन मनोवृत्ती, गर्वाची भाषा, अहंपणाचा महामेरू ही जीवनातील -हासाची कारणे सोबत असतील तर जीवन कदापि सुंदर होणार नाही.

 जीवन सुंदर बनविण्यासाठी काम- क्रोध-लोभ- मत्सररूपी लक्षणांना दूर ठेऊन जीवनात किती ही मोठेपद, प्रतिष्ठा, यश मिळाले तरी अहंकार रूपी सैतानाला दूर ठेऊ या....

चला माणूस बनू या........... !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh