चांगले पुण्यकर्म करत राहा.By-Nilesh Konde-Deshmukh


चांगले पुण्यकर्म करत राहा. By-Nilesh Konde-Deshmukh.
(गोष्ट तशी काल्पनिक आहे परंतु पुण्य कर्मावर आधारित आहे)

एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?

❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!

❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?

❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!

❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"

❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.

❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.

❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?

❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.

❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ?

❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?

❕तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.

❕ती म्हणाली, "तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.

❕राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि,जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली.

❕ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.

❕कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला..?

❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला?
❕तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.

🔸आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले शरीर ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

🔸आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात समाज.

🔸आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, धन-पैसा आपल्या मृत्युनंतर आपली 
 लगेच दुसऱ्याची होते.

🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे पुण्यकर्म जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे,आणि विणा अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतचं असते...!

एक चांगले पुण्यकर्म करत राहा..... !

संकलन/लेखन :. ह भ प निलेश महाराज कोंडे-देशमुख आळंदीकर
मो.नं. ९८९००१३५२०


Published from Blogger Prime Android App

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh