जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh
जेंव्हा तुम्ही पुस्तके वाचता. By-Nilesh Konde-Deshmukh.
📚 भिकाऱ्यात पण माणूसपण दिसायला लागते.
📚 चोरामध्ये चोरी करण्याचे कारण दिसायला लागते.
📚 प्रेम आणि वासना यातला फरक कळायला लागतो.
📚 एखाद्याची चूक झाल्यावर त्याला माफ करण्याची ताकद येते.
📚 कोणत्या ठिकाणी बोलावे आणि कुठे बोलू नये हे कळते.
📚 चाकू, बंदुक यांच्या पेक्षा शब्द जास्त तीक्ष्ण असतात हे समजते.
📚 आई वडीलांची किंमत कळायला लागते.
📚 ब्रेकअप, घटस्फोट, जवळच्या व्यक्तीचे मरण, या गोष्टी म्हणजे पूर्ण जीवन संपले हा गैरसमज दूर होतो.
📚 या गोष्टी पण इतर गोष्टी सारख्याच सामान्य वाटायला लागतात.
📚 प्राण्यांबद्दल आपुलकी वाटायला लागते.
📚 सोशल मिडिया वर हासऱ्या चेहऱ्याचे फोटोज् टाकुण खुश आहेत असं दाखवणारे लोक खऱ्या आयुष्यात किती दुःखी आहेत हे समजते.
📚 कलाकार चित्रपटात नि नाटकात काम करतात. खऱ्या आयुष्यात पण खूप नाटकं करणारी कलाकार आपल्या जवळ असतात हे पण समजते.
📚 या जगात १% चांगली लोक आहेत आणि १% वाईट लोक आहेत. राहिलेले आपण सर्व फक्त अनुयायी आहोत. काहीजण चांगल्या लोकांचे अनुकरण करून चांगले होतात तर काहीजण वाईट लोकांचे अनुकरण करून वाईट होतात, हे पण समजते.
📚 प्रोत्साहनामुळे हरलेला व्यक्ती जिंकू शकतो, हे समजायला लागते.
📚 हारल्यावर किंवा नापास झाल्यावर आत्महत्येचा विचार पण मनात येत नाही.
📚 जीवन जगण्याची नवी उमेद नि एक नवी ऊर्जा निर्माण होते.
📚 आयुष्याच्याप्रति संवेदनशील भावना निर्माण होते.
📚 एकमेकांच्या सुख:दु:खाची तीव्रता कळते.
📚 करोडोची संपत्ती असणाऱ्या मध्ये गरीब तसेच दिवसाला कमी कमवणाऱ्या मध्ये पण श्रीमंती दिसायला लागते.
📚 आयुष्य खऱ्या अर्थाने सुंदर करण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा देतं.
📚 चला मग आयुष्य सुंदर आणि सक्षम करण्यासाठी जसं होईल तसं वेळ काढून पुस्तकं वाचूया जेणें करून आपलं जीवन अर्थपूर्ण आणि समृद्ध बनेल!
nil.konde26@gmail.com
संकलन वारकरी मंच महाराष्ट्र राज्य
मो नं ९८९००१३५२०
Nice sir
उत्तर द्याहटवा