पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोक काय म्हणतील? By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढण्यासाठी मी एक कहानी सांगतो,  पहा तुम्हाला पटते का ? एका भांड्यात चार मेंढक पडलेले होते . त्यातून एक मेंढक उड़ी मारून बाहेर यायचा प्रयत्न करत होता पण को बाहेर पडू शकला नाही. दूसरा मेंढकाने प्रयत्न केला तो पण अपयशी ठरला. आता तिसरा मेंढक प्रयत्न करू की नको विचार करत होता, त्याला अपयशी झालेल्या मेढकानी सांगितले, नको करू प्रयत्न, तू बाहेर पडू शकणार नाही. तरीही त्याने एक वेळा प्रयत्न केला आणि अपयशी ठरला. तीन्ही मेंढक अपयशी ठरले. आता तिन्ही चौथ्याला ओरडून ओरडून वारंवार सांगायला लागले कि, तू प्रयत्न करू नकोय, काहीही फायदा होणार नाही. परंतु चौथ्या मेंढकाने एक उंच उडी मारली आणि चमत्कार झाला, तो भांड्याच्या बाहेर पडला. कारण चौथा मेंढक बहिरा होता, त्याला इतर तिघांनी जे ओरडून ओरडून सांगितले ते ऐकूच आले नाही, तो आपल्या प्रयत्नात यशस्वी झाला. कहानी सांगायचा तात्पर्य  आपल्याला समजलाच असेल, लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपण आपले कार्य चांगल्या मनाने व ठामपणे चालू ठेवावे. " लोकांचे ऐकल्यानंतर तर जंगलाच्या वाघाला सुध्दा सर्कसीमध्ये नाचायला तैयार व्हावं लागत

पदर एक जादुई शब्द. By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
पदर  एक जादुई  शब्द  आहे . काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, अनुस्वार  नाही.  एक  सरळ  तीन अक्षरी  शब्द.  केवढं  विश्‍व., सामावलेलं  आहे त्यात....!! किती अर्थ, किती  महत्त्व..काय  आहे  हा  पदर..!? साडी नेसणाऱ्या  स्त्रीच्या  खाद्यावर रुळणारा  मीटर  दीड मीटर  लांबीचा भाग.......!! तो  स्त्रीच्या  "लज्जेचं रक्षण" तर करतोच, सगळ्यात महत्त्वाचं हे कामच त्याचं. पण,आणखी ही बरीच " कर्तव्यं " पार पाडत असतो..!  या पदराचा उपयोग स्त्री केव्हा,कसा  अन्‌  कशासाठी  करेल, ते  सांगताच  येत  नाही..!? सौंदर्य  खुलवण्यासाठी " सुंदरता "  पदर असलेली " साडी " निवडते. सण-समारंभात   तर   छान-छान" पदरांची" जणू स्पर्धाच लागलेली असते. सगळ्या  जणींमध्ये चर्चाही तीच..!! लहान  मूल  आणि "आईचा  पदर"  हे अजब  नातं  आहे. मूल  तान्हं असताना आईच्या पदराखाली जाऊन  "अमृत  प्राशन" करण्याचा हक्क बजावतं...!! जरा  मोठं  झालं,  वरण-भात  खाऊ  लागलं, की  "त्याचं  तोंड  पुसायला"  आई  पटकन  तिचा  " पदर "  पुढे  करते.!!  मूल  अजून  मोठं   झाल

साहित्यात गुढीपाडव्याचा By-Nilesh Konde-Deshmukh

इमेज
गुढी पाडव्याचा पहिला संदर्भ पुराणांमध्ये मिळतो. ब्रह्मदेवांनी सृष्टीची निर्मिती केली तो आपला पहिला वर्षदिवस होय. इंद्राने याच पाडव्याच्या दिवशी दधिची ऋषींच्या अस्थींच्या योगे बनविलेल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला. रामायण काळात श्रीरामांनी आपल्या राज्यकारभाराला या शुभदिनी आरंभ केला. शालिवाहनाने आपला नवीन शक या दिवसापासून सुरू केला. आता मराठी साहित्यात गुढी पाडव्याचा उल्लेख कुठे केला आहे ते पाहू. हे साहित्य अर्थातच शंभूराजांच्या हौतात्म्य दिनाच्या शेकडो वर्षे अगोदरपासून रचले जात आहे.. ज्ञानेश्वरी – अध्याय ४ था ओवी ५२ वी अधर्मा ची अवधी तोंडी I दोषांची लिहिली फाडी II सज्जनां करवी गुढी I सुखाची उभवी II ज्ञानेश्वरी – अध्याय ६ वा ओवी ५२ वी ऐके संन्यासी तोचि योगी I ऐसी एकवाक्यतेचि जगी II गुढी उभविली अनेगीं I शास्त्रांतरीं II ज्ञानेश्वरी – अध्याय १४ वा ओवी ४१० वी माझी अवसरी ते फेडी I विजयाची सांगे गुढी II येरु जीवीं म्हणे सांडी I गोठी यिया II  लीळाचरित्र -पंडित म्हाइंभट सराळेकर (इ. स . १२७८ च्या आसपास) लीळा २०८ मधील उल्लेख – ” देमती तुरंगम आरोहणी मध्ये – …. “तेथ बाईसासे भाचे दाएनाऐकू होते : त