लोक काय म्हणतील? By-Nilesh Konde-Deshmukh








लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढण्यासाठी मी एक कहानी सांगतो, 

पहा तुम्हाला पटते का ?

एका भांड्यात चार मेंढक पडलेले होते . त्यातून एक मेंढक उड़ी मारून बाहेर यायचा प्रयत्न करत होता पण को बाहेर पडू शकला नाही. दूसरा मेंढकाने प्रयत्न केला तो पण अपयशी ठरला. आता तिसरा मेंढक प्रयत्न करू की नको विचार करत होता, त्याला अपयशी झालेल्या मेढकानी सांगितले, नको करू प्रयत्न, तू बाहेर पडू शकणार नाही. तरीही त्याने एक वेळा प्रयत्न केला आणि अपयशी ठरला.

तीन्ही मेंढक अपयशी ठरले. आता तिन्ही चौथ्याला ओरडून ओरडून वारंवार सांगायला लागले कि, तू प्रयत्न करू नकोय, काहीही फायदा होणार नाही.

परंतु चौथ्या मेंढकाने एक उंच उडी मारली आणि चमत्कार झाला, तो भांड्याच्या बाहेर पडला. कारण चौथा मेंढक बहिरा होता, त्याला इतर तिघांनी जे ओरडून ओरडून सांगितले ते ऐकूच आले नाही, तो आपल्या प्रयत्नात यशस्वी झाला.

कहानी सांगायचा तात्पर्य

 आपल्याला समजलाच असेल, लोक काय म्हणतील याकडे लक्ष न देता आपण आपले कार्य चांगल्या मनाने व ठामपणे चालू ठेवावे.

" लोकांचे ऐकल्यानंतर तर जंगलाच्या वाघाला सुध्दा सर्कसीमध्ये नाचायला तैयार व्हावं लागते "


" लोकं पेरू गोड हाय नवं विचारतात आणि तीखट-मीठ लावून खातात "

संकलन :- वारकरी मंच महाराष्ट्र राज्य.

मो नं : ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh