ही आपलीच कथा आहे आणि राजा आपणच By-Nilesh Konde-Deshmukh

 

©® निलेश



एक राजाला चार राण्या होत्या, पहिली राणी इतकी सुंदर होती! कि तो तिला फक्त प्रेमाने बघत रहायचा?

❕दुसरी राणी इतकी सुंदर होती की, तिला तो सतत जवळ घेऊन बसायचा!

❕तिसरी राणी इतकी सुंदर होती कि, तिला कायम बरोबर घेऊन फिरायचा ?

❕चौथ्या राणीकडे तो कधीच लक्ष द्यायचा नाही !!!!

❕राजा म्हातारा झाला, तो मरणासन्न अवस्थेत असताना त्याने पहिल्या राणीला बोलावले आणी म्हणाला, "मी तुला एवढे प्रेम दिले, तू माझ्याबरोबर येशील का?"

❕राणी म्हणाली मी तुला इथेच सोडुन देणार आहे.

❕राजाला दुखः झाले. मग त्याने दुसऱ्या राणीला तोच प्रश्न विचारला राणी म्हणाली, "मी तुमच्याबरोबर स्मशानापर्यंत येईल त्यापुढे नाही.

❕राजाला अपारं दुखः झालं, त्याने आशेने तिसऱ्या राणीला विचारले, "तू तरी माझ्याबरोबर येशील का नाही ?

❕तिसरी राणी म्हणाली, "मी तुम्ही गेल्याबरोबर दुसऱ्या कुणाबरोबर जाणार आहे, तुमच्याजवळ रहाणार नाही.

❕आता मात्र राजाच्या दुखाःला पारावार राहिला नाही. तो विचार करू लागला. मी या राण्यांवर माझे पुर्ण जीवन घालवले! त्या कधीही माझ्या नव्हत्याच ?

❕माझे जीवन व्यर्थ घालवले, फुकटं वेळ, पैसा, आयुष्य खर्च केले?

❕तेवढ्यात राजाची चौथी राणी तेथे आली, जिच्याकडे राजाने कधीच लक्ष दिलं नव्हते? तिला अंगभर कपडे नव्हते की, तिच्या अंगावर मुठभर मांस नव्हते कि, दागिने नव्हते.

❕ती म्हणाली, "तुम्ही जाल तिकडे येईल. नरकात असो की स्वर्गात, कोणत्याही प्रकारच्या जन्म असला तरी मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. हे माझे तुम्हास वचनं आहे.

❕राजा थक्कं होऊन समोर पहात राहिला, विचार करू लागला कि,जीला मी प्रेम सोडा, साधा प्रेमाचा शब्द कधी दिला नाही, ना पुर्ण आयुष्यात जिचा कधी एक क्षणभर काळजी केली.

❕ती आज माझ्यासाठी सर्वस्व अर्पण करत आहे? राजाच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहू लागले. त्याने मोठ्या समाधानाने आपला प्राण त्यागं केला.

❕कोण होता तो राजा? कोण होत्या त्या तीन राण्या? कोण होती ती चौथी राणी? इतके प्रेम देऊनही तिन्ही राण्यांनी राजाचा त्याग का केला..?

❕त्या उलट ती चौथी राणी, जिच्याकडे राजाने कधीही लक्ष दिले नाही, पण तरीही एवढा त्याग का केला?


❕तो राजा दुसरा तिसरा कोणीही नसुन स्वतः आपणच आहोत.

🔸आपली पहिली राणी जी आपल्याला जागेवरचं सोडते ते म्हणजे आपले *शरीर* ज्याला आपण आयुष्यभर बघत रहातो.

🔸आपली दुसरी राणी स्मशानापर्यंत आपल्याला सोडण्यास येते, ते आपली मुले, आप्तेष्ट, मित्र थोडक्यात *समाज.*

🔸आपली तिसरी राणी, जी आपल्याला सोडून दुसऱ्याकडे जाते म्हणजे, *धन-पैसा* आपल्या मृत्युनंतर आपली 

 लगेच दुसऱ्याची होते.

🔸 आता सर्वात दुर्लक्षित चौथी राणी म्हणजे *पुण्यकर्म* जे आपण सदभावनेने नि:स्वार्थपणे,आणि विणा अहंकाराने केले. जिच्याकडे बघण्यास आपणास अजिबात वेळ नाही, तरीपण जन्मोजन्मी आपल्याबरोबर येतचं असते...!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh