महाभारताचे "नऊ सार सूत्र". By-Nilesh Konde-Deshmukh

 


🔴 १) "जर मुलांच्या चुकीच्या वागण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर शेवटी आपण असहाय्य व्हाल"  - कौरव.


🔴२) "तुम्ही कितीही बलवान असा, परंतु अनीतिने तुमचे ज्ञान, अस्त्र, शस्त्र, सामर्थ्य व आशीर्वाद सर्व काही व्यर्थ ठरतील." - कर्ण.


🔴 ३) "मुलांना इतके महत्वाकांक्षी बनवू नका की, विद्येचा दुरुपयोग करीत स्वत:चा नाश करुन घेऊन सर्वनाशाला आमंत्रण देईल." - अश्वत्थामा.


 🔴४) "कोणाला असे वचन कधीही देऊ नका, की तुम्हाला अधर्मासमोर शरण जावे लागेल." - भीष्म पितामह.


 🔴५) "संपत्ती, सामर्थ्य आणि सत्ता यांचा दुरूपयोग आणि दुराचारी लोकांची संगत शेवटी आत्म-विनाशाचे दर्शन घडविते" - दुर्योधन.


 🔴६) "विचाराने अंध व्यक्ती म्हणजे मद्य, अज्ञान, मोह, काम आणि सत्ता देखील  विनाशाकडे घेऊन जाण्यास कारणीभूत ठरते." - धृतराष्ट्र.


 🔴७) "मनुष्याच्या बुद्धीची सांगड जर विवेकाशी घातली असेल तर विजयाची खात्री पक्की आहे."  - अर्जुन.


 🔴८) "प्रत्येक कामात छल व कपट निर्माण केल्याने आपण नेहमीच यशस्वी होऊ शकत नाही." - शकुनी.


 🔴९) "नीति, धर्म आणि नियत या कर्माचे नियम पाळल्यास जगातील कोणतीही शक्ती आपल्याला पराभूत करू शकत नाही." - युधिष्ठिर.


 या नऊ सूत्रांकडून धडा घ्या अन्यथा पुढे महाभारत होणे निश्चित आहे.


जो इतरांना संपविण्याची तयारी करतो, तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो व संपतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, तो स्वतः कधीच संपत नाही. हीच नियती आहे.


दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा त्याला चांगली वाट दाखवण्याचे कार्य करा.अन्यथा आपली केव्हा वाट लागेल हे सुद्धा कळणार नाही.


"माणसाचा दर्जा हा जात, धर्म व मिळकती वरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो . धर्म कोणताही असो शेवटी हिशोब कर्माचा होतो, धर्माचा नाही."

संकलन : ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर

मो.नं. ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

महादेवाची 108 नावे अर्थासकट. By-Nilesh Konde-Deshmukh