सुखासाठी साधनांची नाही तर समाधानाची गरज असते. By-Nilesh Konde-Deshmukh
https://youtube.com/channel/UCCsIB5Pme7rMS2ZL-nhaNQw
ठेविले अनंते तैसैची रहावे,चित्ती असावे समाधान!
सध्याच्या कालखंडात जे काही आजुबाजुला घडतंय त्याला अनुसरून!!!
जेवढं तुमच्याकडे असूनही तुम्ही दुःखी आहात तेवढं कुणाकडे नसूनही ते सुखी आहेत. न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजेच खरे आयुष्य होय.
सुखासाठी साधनांची नाही तर समाधानाची गरज असते. परमेश्वराचे आभार माना आणि आनंदाने जगा.
हे जग असंच आहे. ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळत नाही आणि ज्याच्याकडे जे आहे त्याला त्याची किंमत नाही. मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात पण तोच माणूस जिवंत असताना समजून घेणारे कुणीच नसतात.
एक गोष्ट लक्षात ठेवा . जिथे तुमच्या मौनाची दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो.
चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसाकडून अपेक्षा दोन्ही व्यर्थच!
समस्या असणं ही खरी समस्या नाही तर समस्ये बाबतचा तुमचा दृष्टिकोन हीच खरी समस्या आहे.
आयुष्य खुप सुंदर आहे. तुम्हीही आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. सर्वानी आनंदात राहा आपला समाजातील माणसांवर जिव्हाळा कायम राहो.....!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा