वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी मंत्र. By-Nilesh Konde-Deshmukh



🔴वैवाहिक जीवन बळकट नसण्याची कारणे.

वैवाहिक जीवन बळकट करण्यासाठी काही लहान -लहान गोष्टींना लक्षात घेणं आवश्यक असतं.   

सध्याच्या आधुनिक काळात शुल्लक कारणांवरून वितंडवाद होतो आणि तो घटस्फोटावर जाऊन थांबतो.

वैवाहिक जीवनात कोणत्या गोष्टींची काळजी न घेतल्यानं नात्यात दुरावा वाढतो.

🔴संवादाचा अभाव.

👉 वैवाहिक जीवनात संवादाच्या अभावामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो. नवरा-बायकोमध्ये संवादाचा अभाव नसावा. नात्यात संवादाच्या अभावामुळे नातं कमकुवत होऊ लागतं. जर का आपणास आपल्या नात्याला अधिक घट्ट करावयाचे असल्यास संवादाचा अभाव होऊ देऊ नका. एकमेकांशी मन मोकळं करून संवाद साधा.

🔴गोष्टी सामायिक न केल्यानं.

👉 वैवाहिक जीवनात एकमेकांशी गोष्टी सामायिक न केल्यानं देखील नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा वाढतो.

आपल्या वैवाहिक जीवनाला बळकट करण्यासाठी नवरा-बायकोने एकमेकांशी सर्व गोष्टी सामायिक कराव्यात. यामुळे आपापसातील संवाद वाढतो आणि सर्व गोष्टींना सामायिक केल्यानं नातं घट्ट होतं.

🔴राग केल्यानं.

👉 वैवाहिक जीवनात रुसवे-फुगवे तर होतातच, त्याशिवाय त्याला रस येत नाही. पण जर का हा राग किंवा रुसवे-फुगवे विकोपाला गेल्यानं नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून लक्षात ठेवा की रागाचा भरात येऊन आपण आपल्या जोडीदाराशी असे काहीही बोलू नये, ज्यामुळे तो किंवा ती आपल्यावर रागावेल. आणि त्यामुळे नात्यात दुरावा येईल.

 🔴अविश्वास दाखवणं.

👉 विश्वास हा कोणत्याही नात्याला घट्ट करण्यासाठी पुरेसा आहे. पण आपले एकमेकांवर विश्वासच नसेल तर नात्यात दुरावा येणं सहजच आहे. त्यामुळे आपल्यातील संबंध तुटू देखील शकतात. आपल्या वैवाहिक जीवनाला बळकट आणि सुदृढ करण्यासाठी नवरा - बायकोचा एकमेकांवर विश्वास असायलाच हवा.


ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर

मो नं ९८९००१३५२०

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कामगार नेते श्री.संतोष बेंद्रे हे कामगार वर्गाला सकारात्मक विचार देणारे व्यक्तिमत्व. - ह.भ.प.निलेशमहाराज कोंडे-देशमुख.

जपमाळ माहिती. By-Nilesh Konde-Deshmukh.

नवऱ्याचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकू शकते ही छोटीशी चूक, विवाहित महिलांनी ठेवावे विशेष लक्ष ! By- Nilesh Konde-Deshmukh