या व्यक्तींची संगत अजिबात करु नये." By-Nilesh Konde-Deshmukh
या व्यक्तींची संगत अजिबात करु नये."
१)आळशी लोक.
आळशी लोकांकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करणे हेच मुळात अपयशाकडे टाकलेले पहिले पाऊल असते. आपल्या आसपास एखादा आळशी व्यक्ती असेल तर तोही योग्यरित्या काम करत नाही आणि आपल्यालाही करु देत नाही. उलट त्याच्यामुळे आपला बहुमुल्य वेळ वाया जातो आणि आपल्या लक्ष्यापासून आपण आणखी दूर जातो.
२)व्यर्थ बडबड करणारे लोक.
अनेकांना बिन महत्त्वाची आणि व्यर्थ बडबड करण्याची सवय असते. असे लोक आपल्या कामामध्ये अडथळा बनतात आणि आपला वेळ वाया घालवतात. असे लोक आसपास असेल तर वेळेत काम होण्याची फार कमी शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांपासून दूर रहावे.
३)नकारात्मक विचारांचे लोक.
भित्रे लोक कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वीच त्याविषयी नकारात्मक विचार करतात. असे लोक स्वत:ही पुढे जात नाही आणि दुस-यांनाही मदत करत नाही. अशा लोकांच्या आजुबाजूला राहिल्याने आपलेही विचार नकारात्मक बनण्याची शक्यता असते. यामुळे आपलाही आपल्या कामातील विश्वास उडण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा लोकांपासून जेवढे अंतर ठेवता येईल तेवढे चांगले.
४)दिखावा करणारे लोक.
असे बहुतांश लोक असतात जे दिखावा फार करतात, मात्र काम कमी करतात. अशा व्यक्तींचे एकमेव उद्देश असेत ते म्हणजे दुस-यांचे लक्ष वेधून घेणे. यासाठी नेहमी दुस-यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्तीपासून आपण नेहमी दूर राहिले पाहिजे.
५)नेहमी नशिबाच्या नावाने बोटे मोडणारे लोक.
जे लोक स्वत: काही करु शकत नाही, असे लोक नेहमी देवाला आणि भाग्याला याबाबत दोष देतात. मात्र देवही त्यांचीच मदत करतो जे स्वत:ची मदत करतात. असे लोक नेहमी आपले दुर्भाग्यपूर्ण कथन ऐकवून ऐकवून आपला वेळ वाया घालवतात. यामुळे त्यांच्यापासूनही दूर रहावे.
ह भ प निलेशमहाराज कोंडे-देशमुख आळंदीकर
मो नं : ९८९००१३५२०
-------------------------------------------------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा